साकोलीतील रुग्णसेवा डॉक्टरांअभावी कोलमडली
By Admin | Updated: May 15, 2015 00:28 IST2015-05-15T00:28:34+5:302015-05-15T00:28:34+5:30
उपजिल्हा रुग्णालयाला जीवनदायीनी म्हणून ओळखले जाते. येथे मोफत उपचार होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक येथे उपचारासाठी आशेने दाखल होतात.

साकोलीतील रुग्णसेवा डॉक्टरांअभावी कोलमडली
संजय साठवणे साकोली
उपजिल्हा रुग्णालयाला जीवनदायीनी म्हणून ओळखले जाते. येथे मोफत उपचार होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक येथे उपचारासाठी आशेने दाखल होतात. मात्र या रुग्णालयाने असुविधेचा कळस गाठला असून औषधोपचाराअभावी रुग्णाना इथून परज जावे लागते. संध्या या उपजिल्हा रुग्णालयात दोनच वैद्यकिय अधिकारी आहेत.
रुग्णांना सर्वोतोपरी औषधोपचार मिळावा यासाठी शासनाने १० वर्षापुर्वी कुटीर रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात केले. यासाठी सुसज्ज अशी इमारत बांधली. या इमारतीत ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्यातील साकोली प्रमुख तालुका असल्यामुळे या रुग्णालयाला उपजिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. या रुग्णालयासाठी शासनाने १ वैद्यकिय अधिक्षक व ७ वैद्यकिय अधिकारी अशी पदे मंजूर केली आहे. मात्र प्रारंभीचा काळ वगळता त्यानंतर या रुग्णालयाला हळूहळू अवकळा येऊ लागली. मागील बऱ्याच वर्षापासून या उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार प्रभारी वैद्यकिय अधिक्षकांकडे आहे. सद्यस्थितीत या रुगणलयात केवळ दोनच वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहेत. मागील आठवड्यात तालुक्यातील जांभळीजवळ ट्रक व बसचा अपघात झाला. यात ३० ते ३५ प्रवाशी जखमी झाले. त्यावेळी साकोली येथील खाजगी डॉक्टरांना उपचारासाठी बोलवावे लागले. यातील गंभीर जखमींना भंडारा तर काहींना नागपूरला हलवावे लागले होते. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असूनही याकडे एकाही लोकप्रतिनिधीचे लक्ष जात नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. (तालुका प्रतिनिधी)