साकोली, तुमसर आगारात परिवहन दिन उत्साहात
By Admin | Updated: June 2, 2016 02:04 IST2016-06-02T02:04:28+5:302016-06-02T02:04:28+5:30
येथील एस.टी. महामंडळातर्फे परिवहन दिन साजरा करण्यात आला. प्रवाशाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले.

साकोली, तुमसर आगारात परिवहन दिन उत्साहात
रोगनिदान शिबिर : फूल देऊन प्रवाशांचे स्वागत
साकोली/तुमसर : येथील एस.टी. महामंडळातर्फे परिवहन दिन साजरा करण्यात आला. प्रवाशाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. बस स्थानक सुशोभित केळीचे खांब, आंब्याच्या पाण्याचे तोरण बांधून स्वच्छता व फुलांची सजावट करण्यात आली होती.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. हेमकृष्ण कापगते, डॉ. रूपेश बडवाईक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुखदेवे, पोलीस निरीक्षक राऊत, आगार व्यवस्थापक जी.आर. भगत, सहायक वाहतुक अधिक्षक टी.एन. गोल्हर उपस्थित होते. आरोग्य शिबिरात १५० कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेतली. बसस्थानकावर महामंडळाच्या विविध योजना व सुविधांची माहिती प्रवाशांना देण्यात आली. सर्व अधिकारी व कर्मचारी यांना महामंडळाच्या निष्ठेबाबत व महामंडळाच्या प्रयत्नशील राहण्याबाबत शपथ देण्यात आली. उद्दीष्टपेक्षा अधिक उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना २० टक्के प्रोत्साहन भत्ता सम प्रमाणात देण्यात आला. प्रवाशांना फुल देवून स्वागत करण्यात आले. त्यावेळी या दिवसाचे आगळे वेगळे स्वरूप प्रवाशांना जाणवले होते. बस स्थानकावर आगार व्यवस्थापक जी.आर. भगत यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
तुमसर : याप्रसंगी तुमसर आगारामध्ये विविध उपक्रम राबविण्याचा मानस बाळगून प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर अधिक भर दिला आहे. त्यासोबतच उदिष्टापेक्षा अधिक उत्पन्न आणणाऱ्या वाहन चालक व वाहकांना स्व:प्रोत्साहन भत्ता कर्मचाऱ्याकरिता लागू करण्यात आले आहे. त्याचबरोबर परिवहन दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे देखिल आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रवाशांनी तसेच कर्मचाऱ्यांनी नि:शुल्क आरोग्य तपासणी करवून घेतली. शिबिरात एस.टी. अधिकारी तसेच आगार प्रमुख नितीनकुमार उजवणे यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
तपासणीकरिता डॉ. सचिन लहाने, डॉ. स्रेहल तुरकर, डॉ. शईम मलेवार, औषध निर्माता विद्या बावनकुळे यांचा सहभाग होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे प्रव्यवस्थापकीय अधीक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे, समाजप्रबोधक राहुल डोंगरे, राहुल भुतांगे उपस्थित होते.
यशस्वीतेकरिता आगार प्रमुख उजवणे, विरेंद्र गभणे, विजय गिदमारे, रेखा भोयर, मारोती बुरडे, अशोक डुले, मोहन बारस्कर, नरेंद्र तिडके, मनोज राखडे, पंचशीला उके, सिमा मेश्राम, माया समरगडे, कांचन कोहपरे, रविता आडे, ज्ञानेश्वर घाटोळे व अन्य चालक वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
(शहर प्रतिनिधी)