साकोली पोलिसांनी राबविला नशामुक्तीचा अभिनव उपक्रम

By Admin | Updated: January 14, 2016 00:49 IST2016-01-14T00:49:40+5:302016-01-14T00:49:40+5:30

पोलीस ठाणे साकोली मार्फत मौजा पळसगाव येथील जि.प. शाळेत नशा व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Sokoli police launched innovative innovation program | साकोली पोलिसांनी राबविला नशामुक्तीचा अभिनव उपक्रम

साकोली पोलिसांनी राबविला नशामुक्तीचा अभिनव उपक्रम

साकोली : पोलीस ठाणे साकोली मार्फत मौजा पळसगाव येथील जि.प. शाळेत नशा व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात लोकांनी नशामुक्त व्हावे व स्वत:चे भविष्य सुधारावे करिता मनोज कोटांगले रा. एकोडी यांनी कलापथकाचे माध्यमातून नशा केल्याने मानवी शरीरावर होणाऱ्या दृष्परिणामाबाबत व समाजाचा व्यसनाधीन व्यक्तीकडे पाहण्याच्या दृष्टीकोन याबाबत महत्व पटवून दिले. तसेच बाबुराव भाजीपाले रा. परसोडी यांनी व्यसनमुक्त राहण्याकरिता उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच तिरतराम शहारे रा. पिंडकेपार यांनी जे इसम दारू पिण्याच्या आहारी गेल्याने त्यांचे संसार उध्वस्त होतात अशा इसमांना दारू पिण्यापासून प्रवृत्त होणेसाठी समाजप्रबोधनपर प्रवचन केले.
या प्रवचनातून उपस्थितांपैकी जवळपास ३५ ते ४० लोकांनी दारू सोडल्याबाबत शपथ घेवून भविष्यात दारू अथवा कोणतेही व्यसन करणार नाही याबाबत स्वईच्छा दर्शवली. तिरतराम शहारे रा. पिंडकेपार यांनी लोकांनी दारूचे व्यसन सोडावे म्हणून मोफत औषध वाटप केली. ठाणेदार सुरेशकुमार घुसर यांनी उपस्थित गावकरी लोकांना नशामुक्त व व्यसनमुक्त होण्यासाठी प्रोत्साहीत करून जोपर्यंत स्वत:चे दृढ निश्चय राहणार नाही तोपर्यंत लोक नशामुक्त होणार नाही व कुटूंबातील स्त्री शिक्षित असल्यास घरचा सदस्य नशामुक्त होण्याचे फायदे पटवून दिले पोलीस स्टेशनमार्फत होणाऱ्या अशा व्यसनाधीनतेचे कार्यक्रमाला सर्वबाजुंनी स्वागत व कौतुक होत आहे
कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, सहायक फौजदार गोंडगे, पोलीस हवालदार गोबाडे, भुतांगे, पोलीस नायक भजनकर, गायकवाड, पोलीस शिपाई पाठक्, पळसगाव येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच कामिनीबाई भेंडारकर, तंटामुक्ती अध्यक्ष पुरूषोत्तम वाढई, पोलीस पाटील पे्रमलाल कोरे यांनी अथक परिश्रम घेवून कार्यक्रम यशस्व केला. जवळपासचे गावातील व परिसरातील लोकांनी सहभाग दर्शविला. सदर कार्यक्रमात ८०० ते १००० नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sokoli police launched innovative innovation program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.