शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
5
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
6
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
7
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
8
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
9
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
10
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
11
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
12
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
13
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
14
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
15
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
16
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
17
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
18
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
19
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
20
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

मातीतील कुस्ती आता गादीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:28 IST

आॅनलाईन लोकमतमोहाडी : सव्वीस जानेवारी हा दिवस रोहणा या गावात पटाचा दिवस. पन्नास वर्षापूर्वी पटाचा दिवस नेमला गेला होता. वर्षा मागे वर्ष गेली पण, पटाचा उत्साह तोच असायचा. तथापी, पटबंदीने पटावर संक्रात आली. परंतू गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण देण्यासाठी तरुण सरपंच नरेश ईश्वरकर यांनी पटाला पर्याय म्हणून शंकर पटाच्या जागी कुस्ती ...

ठळक मुद्देपरंपरेला पर्याय: रोहणा येथे रंगला कुस्त्यांचा फड

आॅनलाईन लोकमतमोहाडी : सव्वीस जानेवारी हा दिवस रोहणा या गावात पटाचा दिवस. पन्नास वर्षापूर्वी पटाचा दिवस नेमला गेला होता. वर्षा मागे वर्ष गेली पण, पटाचा उत्साह तोच असायचा. तथापी, पटबंदीने पटावर संक्रात आली. परंतू गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण देण्यासाठी तरुण सरपंच नरेश ईश्वरकर यांनी पटाला पर्याय म्हणून शंकर पटाच्या जागी कुस्ती स्पर्धा भरवली. पहिल्यांच वर्षी रोहण्यात तब्बल तीन दिवस कुस्त्यांचा फड रंगला. कुस्ती स्पर्धेने पटाची उणीव भरुन काढल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.रोहणा या गावात १९४७ सालपासून शंकर पटाला सुरुवात झाल्याचे सांगितल्या जाते. २६ जानेवारी रोहणा गावात सांस्कृतिक जलसा साजरा होता. साठ वर्षानंतरही गावातल्या सांस्कृतिक पर्वनीला नवीन पिढीनेही खंड पडू दिला नाही. रोहणा येथील किसन बुराडे, डोमाजी बोंदरे, झिबल ईश्वरकर, सुकल टिचकुले, शिवराम झंझाड या व्यक्तींनी शंकर पटाची बीजे रोवली. रोहणा परिक्षेत्रात शंकरपटाने विशेष ओळख करुन दिली. २६ जानेवारी म्हणजे रोहण्याचा पट असाच उल्लेख आजही होतो.रोहणा या गावातील पटाने अनेक स्थित्यंतरे बघितली आहेत. अवघड परिस्थितीतही पटाची परंपरा गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे. पटाच्या दानीवर एक बैलजोडी हाकलून पटाची पर्वणी सुरु करणाऱ्यांना मानाची सलामी दिली. तसेच परंपरेलाही गावकºयांनी जपले. पण, शासनाने शंकरपटावर बंदी घातल्याने रोहण्यात बैलाच्या पटाला पर्याय म्हणून कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. तीन दिवस चाललेल्या कुस्ती फंडात २५० च्या वर पुरुष महिला सहभागी झाले होते. अतिशय छान कुस्तीच्या स्पर्धेने रंगत आणली होती. गावातील पुरुष-महिला मंडळीनी कुस्त्यांच्या आश्वाद घेतला. शंकरपटाची उणीव कुस्ती स्पर्धेने जाणवू दिली नाही. रोहणा या गावातही आखाडा आहे. येथेही मल्ल तयार होतात. लाल ताीत खेळलेला तरुण सरपंच नरेश ईश्वरकर यांनी शालेय कुस्ती स्पर्धेत व अनेक ठिकाणी आयोजित होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत नाव कमावले आहे. उत्कृष्ठ मल्ल म्हणून नाव कमावलेल्या या सरपंचाने गावात पटाला पर्याय कुस्तीचा दिला. पहिल्याच वर्षी भव्य कुस्तीचा आखाडा रंगला. त्यामुळे गावात होणाऱ्या पाहुण्यांना रंगतदार कुस्तीचा सोहळा बघता आला. रोहण्यात पाहुण्यांना मेजवाणीसाठी नवटंकी नाटक, तमाशा आदी कार्यक्रमाचे आयोजनही केले. खास करुन या तीन दिवशी मुलींच्या लग्न जोडाजोडीचा विशेषत्वाने कार्यक्रम आखला जातो. या तीन दिवस अनेक मुला-मुलींचे लग्न जोडले जातात.रोहण्यात प्रत्येक घरी पाहुणे येतात. कधी काळी तर पाहुण्यांचे सामुहिक जेवणही व्हायचे एवढे पाहुणे रोहण्यात येत असल्याचे वृध्द यादोराव भगत यांीन लोकमतला सांगितले.