अन् त्यांनी जोपासले सामाजिक दायित्व
By Admin | Updated: September 28, 2015 00:57 IST2015-09-28T00:57:52+5:302015-09-28T00:57:52+5:30
गणेश विर्सजनच्या पुर्वसंध्येला गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी तलावातील गाळ व कचरा काढून ....

अन् त्यांनी जोपासले सामाजिक दायित्व
वरठीतील प्रकार : श्रमदानातून उपसला तलावातील गाळ, गणेश विसर्जनासाठी केली व्यवस्था
तथागत मेश्राम वरठी
गणेश विर्सजनच्या पुर्वसंध्येला गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी तलावातील गाळ व कचरा काढून सामाजिक दायित्वाचे उत्तम उदाहरण ग्रामस्थांसमोर सादर केले आहे. गावात सार्वजनिक उत्सवादरम्यान या तलावात मूर्र्तींचे विसर्जन केले जाते. पण स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे तलावात दुर्गंधी व घाण वाढली होती.
गावाच्या मध्यभागी इंग्रजाच्या काळापासून मोठे तलाव आहे. मध्यभागी तलाव असल्यामुळे गावात या तलावाचे मोठे महत्व आहे. पण नियमीत गाळ उपसा न झाल्यामुळे तलावाच्या चार ही भागात मोठया प्रमाणात वनस्पती उगवल्या आहेत. तलावाची देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे सर्वत्र तलावात जमा झाल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. याकडे प्रशासनाचे नियमीत दुर्लक्ष होत आहे.
गावातील सार्वजनिक उत्सव दरम्यान सर्व मूर्त्यांचे विसर्जन या तलावात होते. तलावात मोठया प्रमाणात असलेले पाणी सर्वत्र पसरलेली घाण, गाळ व वनस्पती वाढल्यामुळे तलावात धार्मिक विधी करणे धोकादायक आहे. सध्या सार्वजनिक उत्सवाचे सत्र सुरु आहेत. यामुळे ग्रामपंचायत सदस्य थारनोद डाकरे, रवींद्र बोरकर, चांगदेव रघुते, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे व ओ.बी.सी. सेवा संघ वरठीचे अध्यक्ष वीरेंद्र देशमुख यांनी तलावातील गाळ उपसून आजुबाजूला असलेली वनस्पती काढूून विसर्जनासाठी जागा मोकळी करुन दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सुटी असूनही योगदान दिले. उपेक्षित असलेले तलावाला पाळ आहे हे प्रथमच दिसले.
गावाच्या मुख्य मार्गावर असलेल्या तलावाच्या दुरव्यवस्थेला जबाबदार कोणी ही असले तरी समस्याची जाण ठेवून तत्परता दाखवून स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.