सामाजिक न्याय विभागाची कार्यकारिणी
By Admin | Updated: August 6, 2016 00:33 IST2016-08-06T00:33:01+5:302016-08-06T00:33:01+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित बैठकीत राकॉंच्या सामाजिक न्याय विभागाचे ....

सामाजिक न्याय विभागाची कार्यकारिणी
राष्ट्रवादी काँग्रेस : जिल्हा कार्यालयात पार पडली सभा
भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित बैठकीत राकॉंच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र वानखेडे यांनी घोषित केली. यावेळी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांना प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नरेश डहारे, सच्चिदानंद फुलेकर, सुनंदा मुुंडले, सुमेध शामकुवर, किसना भानारकर, दीपक चिमनकर, नितीन तुमाने, अरुण गोंडाने, नगरसेविका विद्या फुलेकर, अरुण अंबादे, संजय सतदेवे, संजय केवट, अंगराज समरीत, शैलेश मयुर, धनराज साठवणे, नरेश चुन्ने, सुरेशसिंग बघेल, सुरेखा जनबंधू, मनोरथा जांभुळे, मनोज शेंडे, राजु मेश्राम, रघुनाथ जनबंधू, सुनिल नागदेवे, सविता शहारे, अजय चवरे, मनिष गणवीर, ललीत जांभुळकर, पराग सुखदेवे, डॉ.ज्योती वानखेडे, रत्नमाला वैद्य, सुरेखा शहारे, दिपाली जांभुळकर, ओम करणकर, अनंत बोदेले, शिरीष धारगावे, मोनु गोस्वामी उपस्थित होते. या कार्यकारिणीत तुमसर विधानसभा अध्यक्ष विलास विठोबा वासनिक. साकोली विधानसभा अध्यक्ष मनोहर रंगारी, भंडारा विधानसभा अध्यक्ष नितीन वानखेडे, भंडारा तालुका अध्यक्ष डॉ. यशवंत मडामे, पवनी तालुका अध्यक्ष सितकुर गेडाम, तुमसर तालुका अध्यक्ष डॉ. अरुण गजभिये, मोहाडी तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, लाखनी तालुका अध्यक्ष रविंद्रकुमार मेश्राम, लाखांदूर तालुका अध्यक्ष शीलमंजू सिंहगडे, साकोली तालुका अध्यक्ष शैलेश गजभिये, भंडारा शहर अध्यक्ष डॉ. परिघ गजभिये, पवनी शहर अध्यक्ष जयपाल नंदागवळी, तुमसर शहर अध्यक्ष तिलक गजभिये, मोहाडी शहर अध्यक्ष नंदलाल भैसारे, वरठी शहर अध्यक्ष कैलास बन्सोड, लाखनी शहर अध्यक्ष रवि राऊत यांचा समावेश आहे. संचालन प्रा. ज्योती कानेकर यांनी तर आभारप्रदर्शन अरुण अंबादे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)