शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar : 'आघाडीमध्ये संधी मिळाल्यास आमच्याकडे जयंत पाटलांसारखा अनुभवी चेहरा'; रोहित पवारांचं सूचक विधान
2
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
3
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
4
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
5
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
6
स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार
7
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
8
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
9
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
10
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
11
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
12
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
13
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
14
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
15
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
16
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
17
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
18
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
19
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
20
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 

सामाजिक वनीकरण विभागात गौड बंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:46 AM

पर्यावरणाचा समतोल व प्रदूषण रोखण्याकरिता वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा संकल्प वनविभागाने घेतला. एकच लक्ष्य दोन कोटी वृक्ष असे घोषवाक्य तयार करण्यात आले.

ठळक मुद्देतुमसर तालुक्यातील प्रकार : मजुरांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह, अंदाजपत्रक फलक लागले आकड्याविना

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पर्यावरणाचा समतोल व प्रदूषण रोखण्याकरिता वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा संकल्प वनविभागाने घेतला. एकच लक्ष्य दोन कोटी वृक्ष असे घोषवाक्य तयार करण्यात आले. तुमसर तालुक्यात सामाजिक वनिकरण विभागाने वृक्ष लागवडीचा फज्जा उडाला असून कामाच्या ठिकाणी अंदाजपत्रक फलक रिकामेच आहे. मजुरांची नियुक्ती संशयाच्या विळख्यात असून किरकोळ साहित्य व औषधांच्या बिलावर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकाºयांचा दौरा सुद्धा येथे नावापुरताच दिसत आहे. डोंगरला येथील उद्यानातील बालकांचे साहित्याला जंग लागत आहे.तुमसर सामाजिक वनीकरण विभागातर्फे विविध कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील गावात वृक्षलागवड व रोपवाटिकेची कामे केली. यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत डोंगरला ते सितेपार मार्गावर वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला. दोन कि़मी. अंतरावर रोपांची संख्या एक हजार आहे. डोंगरला येथे पिशवीतील उंच रोप निर्मितीचेही कामे करण्यात आलेल्या एकूण एक हजार १०० (२५-४०) उंचीची रोपे तयार करण्यात आली. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत डोंगरला येथे एकूण ५० हजार रोपनिर्मितीची कामे करण्यात आली. रोपनिर्मिती केलेल्या रोपांची उंची १२-५-२५ सेमी इतकी आहे. विंधन विहार क्रमांक १ च्या कामाअंतर्गत एक एकर क्षेत्रात आधुनिक रोपवाटीका तयार करण्यात आली. वनमहोत्सव योजनेअंतर्गत डोंगरला येथे रोपवाटीका तयार करण्यात आली. परंतु यात विभागाने कोणती रोपे लावली किती लावली, त्यांची उंची किती. एकूण क्षेत्र लहान व उंच रोपे किती याबाबत कसलाच उल्लेख करण्यात आले नाही. डोंगरला ते तुमसर अंतर दोन कि़मी. असून या मार्गावर दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. यात अंदाजपत्रकीय किंमत व कामे सुरू केल्याचा तारखेचा उल्लेख नाही. डोंगरला येथे मुलांचे खेळण्याचे व व्यापाºयाचे साहित्य लावण्यात आले. परंतु जातानी अडचणी आहेत. वृक्ष लागवडीमुळे जातानी भिती वाटते. वृक्षलागवड व रोपवाटीकेच्या कामांवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांच्या सुरक्षेकरीता जवळील जंगलातील झाडे तोडून संरक्षण करण्याचा केविलवाना प्रकार येथे दिसून येत आहे. वृक्षांच्या संवर्धनाकरिता काटेरी तार किंवा काटेरी झाड लावण्याची येथे गरज होती.वृक्षांच्या देखरेखीवर प्रश्नचिन्हवृक्ष लागवडीनंतर पाच वर्षापर्यंत वृक्षांची देखरेख करावी लागते. वृक्षांवर औषधी फवारणी करणे, खतपाणी घालणे, औषधे व किटकनाशक खरेदींची कामे विना निवेदने सुरू आहेत. दुकानांची बिले येथे जोडण्यात आली आहेत. या बिलात जीएसटी नाही, अशी माहिती असून तुमसर व खापा येथून औषधे खरेदी केल्याची माहिती आहे.आकड्याविना लागलेले फलकडोंगरला, सितेपार, तुमसर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत केलेल्या कामांची अंदाजपत्रकीय किंमतीचा लोखंडी फलकावर उल्लेख नाही. ही सर्व कामे संशयाच्या भोवºयात दिसून येत असून केवळ कागदोपत्री कामे झाली काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मजुरांच्या नियुक्तीत संशयवृक्षलागवड व रोपवाटीकेच्या कामावर मजुरांची नियुक्ती करण्यात येते. त्यांची माहिती एमआयएमईमार्फत शासनाला आॅनलाईन पाठविण्यात येते. एका गावाचे मजूर दुसºया गावात तथा ठराविक मजूरांनाच कामे दिल्याची येथे शक्यता वर्तविण्यात येत आहे.वरिष्ठांचे दुर्लक्षसामाजिक वनीकरण विभागाचे भंडारा येथील उपसंचालक तुमसर येथे आठवड्यातून दोन ते तीन दिवस पाहणी करीता येत होते. फलकावरील रिकाम जागा त्यांना दिसली नाही काय, हा दौरा नावापुरताच आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील सामाजिक वनीकरण विभागाचे तालुकाधिकारी मागील १५ दिवस रजेवर होते, अशी माहिती आहे.मागील तीन वर्षात सामाजिक वनीकरण विभागाने तुमसर व मोहाडी तालुक्यात किती कामे केली. शासनाने किती निधी मंजूर केला. मजुरांची संख्या व साहित्य खरेदीचा अहवाल मागितला आहे. कामात कसूर आढळल्यास संबंधित अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.- चरण वाघमारे, आमदार तुमसर.वृक्ष लागवड, रोपवाटीका व साहित्य खरेदींची कामे शासनाच्या नियमानुसार करण्यात आली असून कुठेच अनियमितता नाही. पारदर्शकपणे कामे करण्यात आली आहेत.-एफ.एम. राठोड, परिक्षेत्र अधिकारी,सामाजिक वनिकरण तुमसर.