सामाजिक बांधिलकीचा वसा अविरत ठेवणार
By Admin | Updated: April 27, 2016 00:28 IST2016-04-27T00:28:38+5:302016-04-27T00:28:38+5:30
सन २००४ पासून मोहरणा येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन नियमित करीत आहोत.

सामाजिक बांधिलकीचा वसा अविरत ठेवणार
विनोद पटोले यांचे प्रतिपादन : मोहरणा येथील सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा, आठ जोडपी विवाहबद्ध
लाखांदूर : सन २००४ पासून मोहरणा येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन नियमित करीत आहोत. सामाजिक बांधिलकी व समाजसेवेचा उदात्त हेतू मनाशी बाळगून वैयक्तिक लग्न समारंभाला येणारा जास्तीचा खर्च कमी करण्याचा हा प्रयत्न असाच सुरु ठेवणार असल्याचे मत खासदार नाना पटोले यांचे मोठे बंधू विनोद पटोले यांनी व्यक्त केले. तालुक्यातील मोहरणा येथील सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सरपंच ग्रिष्मा राऊत, न.प. सदस्य रामचंद्र राऊत, पं.स. सदस्य शिवाजी देशकर, अशोक चांडक, जि.प. सदस्य मनोहर राऊत, जि.प. सदस्य प्रदीप बुरडे, जि.प. सदस्या प्रणाली ठाकरे, ईश्वर घोरमोडे, ताराचंद मातोर, टिकाराम झोडे, रज्जू पठाण, प्रकाश राऊत, प्रभू राऊत, लिवन पारधी, नाना पिलारे, दादा राऊत, नाना रासेकर, ऋषी राऊत, राजू भानारकर, यादोराव माटे, ताराचंद गुरनुले, मेहबुब पठाण, वंदना ढोरे, उमेश राऊत, अॅड.जितेंद्र राऊत व अन्य मंचकावर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, या भागातील शेतकरी व सर्वसामान्याशी असलेले संबंध या भागातील मातीशी नाड जोडून आहेत. सुख असो वा दु:ख ते कुटुंबाप्रती समजून काही प्रमाणात खारीचा वाटा उचलण्याचा हा प्रयत्न विवाह सोहळ्याच्या माध्यमातून सुरु असून पुढेही सुरु राहणार असल्याचे मत पटोले यांनी व्यक्त केले. रामचंद्र राऊत यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, शेतकरी आत्महत्या या नापिकी व कर्जाला कंटाळून होतात. यात मुलामुलींचे लग्न हा मोठा प्रश्न यातून श्रम वेळ व खर्च याला कात्री लावण्याचा पटोले यांचा प्रयत्न मागील १२ वर्षांपासून सुरु आहे. मित्र परिवाराकडून दरवर्षी असेच सोहळ्यांचे प्रयत्न सुरु राहणार असल्याचे ते बोलले. सदर विवाह सोहळ्यामध्ये ८ जोडपी विवाहबंधनात अडकले असून पटोले व मित्र परिवाराकडून संसार उपयोगी साहित्य व एलसीडी भेट देण्यात आली. हजारो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. (तालुका प्रतिनिधी)