मुस्लीम बांधवांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

By Admin | Updated: January 4, 2015 23:05 IST2015-01-04T23:05:41+5:302015-01-04T23:05:41+5:30

रविवारी ईद-ए-मिलाद सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील मुस्लीम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी व परीक्षा घेतली.

Social commitment created by Muslim brothers | मुस्लीम बांधवांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

मुस्लीम बांधवांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

भंडारा : रविवारी ईद-ए-मिलाद सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील मुस्लीम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी व परीक्षा घेतली. परिक्षेला मुस्लीम व हिंदू विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला, हे विशेष.
हजरत मोहम्मद मुस्तफा सल्ललाहू अलही सल्लम यांचा जन्म दिवस म्हणून ईद-ए-मिलाद सण साजरा केल्या जातो. या दिनानिमित्त मोहम्मदांचे कर्तव्य किंवा त्यांनी जगाला दिलेला शांतीच्या संदेशाची महती कळावी, यासाठी शहरातील मुस्लीम लायब्ररीच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी परीक्षा घेतली. यात शहरातील शाळांमध्ये संपर्क केला. परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना निशु:ल्क प्रवेश देण्यात आला होता. ही परिक्षा उत्साहात पार पडली.

Web Title: Social commitment created by Muslim brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.