शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

आंधळगाव ठाण्याच्या हद्दीत जनावरांची तस्करी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:59 IST

जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गो-वंशाची तस्करी सुरु असून याचे मुख्य केंद्र मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. दरमहा लाखो रुपयांची वसुली पोलिसांकडून केली जात असून कामठी आणि मध्यप्रदेशातून आलेल्या व्यापाऱ्यांना येथे लुटल्या जात आहे.

ठळक मुद्देलाखोंची वसुली : धोप येथे गोळा केली जातात जनावरे

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गो-वंशाची तस्करी सुरु असून याचे मुख्य केंद्र मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. दरमहा लाखो रुपयांची वसुली पोलिसांकडून केली जात असून कामठी आणि मध्यप्रदेशातून आलेल्या व्यापाऱ्यांना येथे लुटल्या जात आहे.गत तीन वर्षांपासून जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात गाय, बैल यासह म्हशींचा समावेश असतो. आंधळगाव पोलीस ठाण्यांतर्गत धोप येथे नागठाणा रस्त्यावर शेकडो जनावरे गोळा केली जातात. रात्रीच्या वेळी या जनावरांना वाहनात कोंबले जाते. या ठिकाणी आंबागड, रामपूर, गायमुख नगर, ताडगाव, जांब, नवेगाव, सिवनी येथील जनावरे आणली जातात. अत्यंत निर्दयपणे वाहनात ही जनावरे कोंबून त्यांचा प्रवास केला जातो. आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरु आहे. पोलीस जाणीवपूर्वक बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या जनावर तस्करांकडून दरमहा लाखो रुपयांची वसुली केली जात असल्याची माहिती आहे.आंबागड येथे बैलबाजार बंद करण्याकरिता एका संघटनेने पुढाकार घेता होता. पुन्हा पोलिसांच्या आशीर्वादाने बैलबाजार सुरु झाला आहे. रस्त्याने जनावरांची वाहतूक भरधाव वेगाने केली जाते. वाहनांमध्ये जनावरे अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबली जातात. त्यामुळे काही जनावरांचा तडफडून मृत्यू होतो. महिनाभरापूर्वी नागपूरच्या प्राणीमित्र संघटनेने या परिसरात जनावरांचे ट्रक पकडून पोलिसांच्या हवाली केली होते. परंतु त्यानंतरही हा प्रकार खुलेआम सुरु आहे.आंबागड वरून जनावरे पायी धोप येथे आणले जातात. तेथून ट्रक व इतर वाहनांद्वारे जनावरे विकण्यासाठी नेले जातात.यात मध्यप्रदेश आणि कामठी येथील व्यापाऱ्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे हा बाजार आता शेतकºयांचा राहिला नसून व्यापाºयांच्या दावणीला बांधला आहे. मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात जनावरे येथे विक्रीसाठी नेली जातात. यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. गायमुख, जांब, कांद्री या मार्गाने ही वाहतूक होत आहे. जंगलव्याप्त गावात सदर बाजारातून वाहतूक होत असताना हप्तेखोरीमुळे पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.बैल बाजाराला पोलिसांचा आशीर्वादआंबागड येथे भरणाºया बैल बाजाराला एका संघटनेने विरोध दर्शविला होता. त्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. पोलिसांनी जनावरांचा बाजार बंद केला. परंतु काही दिवसातच पुन्हा हा बाजार सुरु झाला आाहे. या बैलबाजाराला आंधळगाव पोलिसांचा आशीर्वाद असून व्यापाºयांशी येथील पोलिसांचे हितसंबंध गुंतले असल्याची चर्चा आहे.