देशी दारूची तस्करी करणारे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:22 IST2018-07-02T23:22:41+5:302018-07-02T23:22:58+5:30

पवनी तालुक्यातील मांगली येथून चारचाकी वाहनाने दारूचा पुरवठा होत असल्याची गोपणीय माहिती पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या रेड स्कॉड पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने हे वाहन पकडून कारवाई केली.

A smuggler caught the country's liquor smugglers | देशी दारूची तस्करी करणारे वाहन पकडले

देशी दारूची तस्करी करणारे वाहन पकडले

ठळक मुद्देमांगली येथील घटना : रेड स्कॉड पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पवनी तालुक्यातील मांगली येथून चारचाकी वाहनाने दारूचा पुरवठा होत असल्याची गोपणीय माहिती पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या रेड स्कॉड पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने हे वाहन पकडून कारवाई केली.
मांगली येथील दारु दुकानासमोर एक चारचाकी क्र. (एमएच ३४ के ८९२७) वाहनामध्ये देशी दारुने भरलेल्या कागदी खरड्याचे १०० पेट्या दारू जप्त करण्यात आले. या दारूचा साठा लगतच्या दारूबंदी असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात पाठविण्यात येत होता, अशी माहिती कारवाई करणाऱ्या पथकातील पोलीस कर्मचाºयांनी सांगितले.
दारू दुकानदाराने त्याच्या तीन मजुरांना वाहनामध्ये दारूच्या पेट्या भरण्यासासाठी सांगितले होते. घटनास्थळी वाहन चालक, मालक देशी दारु दुकानावर व तीन मजूर मिळून संगनमताने कटकारस्थान रचून व शासकीय परवाण्याचे उल्लंघन केल्याचे मिळून आल्यामुळे त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम ६५ (ई), ७७ (अ), ८२ (१) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक आडोळे, फौजदार मेहर, भालेराव, शिवनकर, पिंदुरकर यांनी केली.

Web Title: A smuggler caught the country's liquor smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.