खाद्यतेलासह सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

By Admin | Updated: October 24, 2016 00:38 IST2016-10-24T00:38:59+5:302016-10-24T00:38:59+5:30

अन्न व औषध प्रशासन कार्यालय भंडारातर्फे केलेल्या कारवाईत विना लेबलच्या खाद्यतेलाचा साठा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.

Smoked tobacco stocks with edible oil | खाद्यतेलासह सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

खाद्यतेलासह सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : ४५ हजारांचे साहित्य
भंडारा : अन्न व औषध प्रशासन कार्यालय भंडारातर्फे केलेल्या कारवाईत विना लेबलच्या खाद्यतेलाचा साठा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या दोन्ही साहित्यांची किंमत ४४ हजार ९६३ रुपये सांगण्यात येते.
माहितीनुसार महागाव येथील (मोरगाव) प्रेमचंद साधवानी यांच्या मालकीच्या किराणा दुकानात तपासणीच्या वेळी अन्न पदार्थांसोबत प्रतिबंधित असलेल्या सुगंधीत तंबाखूचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे दिसून आले. ३० किलोग्रॅम असलेला हा साठा त्याची किंमत १६ हजार ७२५ रुपये सांगण्यात येते. तसेच याच गावातील साई किराणा स्टोर्सच्या तपासणीदरम्यान विना लेबलचा खाद्य तेलाचा साठा आढळून आला.
१५ किलो वजनाचे २६ पॅकींग केलेले टीन व एक खुला टीन असे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या खाद्य तेलाचा साठा ४०३ किलोंचा असून त्याची खुल्या बाजारात किंमत २८ हजार २३८ रुपये सांगण्यात येते. सदर कारवाई भंडारा येथील अन्न सुरक्षा अधिकारी बि.जी. नंदनवार, अरविंद पालीवार व कोयलवार यांनी सहभाग नोंदविला.
दिवाळीचा सण तोंडावर आहे. या निमित्ताने अन्न, औषध व प्रशासन विभागातर्फे पदार्थांमधील भेसळ शोधण्यासाठी तपासणी करीत आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी व दर्जेदार खाद्य पदार्थ नागरिकांना मिळावे यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूनेही सदर विभाग प्रयत्नशिल असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी बी.जी. नंदनवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Smoked tobacco stocks with edible oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.