स्मितहास्याने सोडला परीक्षेचा नि:श्वास !
By Admin | Updated: March 22, 2015 01:33 IST2015-03-22T01:33:44+5:302015-03-22T01:33:44+5:30
हुश्श! संपली एकदाची परीक्षा. असे म्हणत एखादा पराक्रम केल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.

स्मितहास्याने सोडला परीक्षेचा नि:श्वास !
राजू बांते मोहाडी
हुश्श! संपली एकदाची परीक्षा. असे म्हणत एखादा पराक्रम केल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. शुक्रवारला शेवटचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
विद्यार्थी जीवनात महत्त्वाची समजली जाणारी दहावी-बारावीची परिक्षा संपली आहे. यावर्षी मोहाडी तालुक्यात दहावी-बारावीच्या परिक्षेत एकही विद्यार्थी नकला करताना सापडला नाही. जिल्ह्यात राबविलेल्या कॉपीविरोधी मोहिमेचे हे यश असल्याचे दिसून आले. परीक्षा मंडळाने गैरप्रकाराविरुध्द लढा चालविला. मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या लढ्याला यश येत नव्हते. स्थानिक प्रशासनाने परिक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करुन त्याची अंमलबजावणी केली. तेव्हापासून परिक्षेतील गैरप्रकारावर नियंत्रण आले.
ग्रामीण भागातही कॉपीमुक्त परिक्षा होवू शकतात. ग्रामीण विद्यार्थ्थानी दाखवून दिले आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी सच्चिंद्र सिंह यांनी सुरू केलेली ही मोहीम जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी सुरू ठेऊन कॉपीमुक्त अभियान राबविले. या अभियानामुळे पुढच्या काळात सकारात्मक व गुणात्मक बदल येणार आहेत. मागील १० वर्षापूर्वीचा परीक्षा केंद्रावरचे चित्र शिक्षण क्षेत्राला नासविणरे होते. आज चित्र पालटले आहे. परीक्षा केंद्रावरच्या भोवती होणारी गर्दी थांबली आहे.