स्मार्टफोनने आणली सायबर कॅफेवर संक्रांत

By Admin | Updated: October 29, 2014 22:44 IST2014-10-29T22:44:29+5:302014-10-29T22:44:29+5:30

दोन वर्षाअगोदर सायबर कॅफेला फार महत्व होते. मित्रांसोबत चॅटिंग, शैक्षणिक कामासाठी सायबर कॅफेचा वापर, ई-मेलद्वारे संदेश पाठवण्यासाठी सायबर कॅफेवर गर्दी असायची.

Smartphone brings cyber cafes | स्मार्टफोनने आणली सायबर कॅफेवर संक्रांत

स्मार्टफोनने आणली सायबर कॅफेवर संक्रांत

भंडारा : दोन वर्षाअगोदर सायबर कॅफेला फार महत्व होते. मित्रांसोबत चॅटिंग, शैक्षणिक कामासाठी सायबर कॅफेचा वापर, ई-मेलद्वारे संदेश पाठवण्यासाठी सायबर कॅफेवर गर्दी असायची. मात्र, आता हे चित्र पालटले असून आता सायबर कॅफेवर मोबाईलमुळे संक्रांत आली आहे.
आधुनिक काळातील नव्या तंत्रज्ञानाबरोबरच मोबाईल जगतातही क्रांती झाली आहे. टॅब, आयफोन यांच्याबरोबर दररोज बाजारात येणारे नवीन तंत्रज्ञान, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किमती, नवीन विकसित तंत्रज्ञानाच्या वस्तू वापरण्याची वृत्ती, सहज आणि वेगाने उपलब्ध होणारे इंटरनेट यामुळे सध्याचा जमाना चांगलाच वेगवान झाला आहे.
जगभरात कोणतीही गोष्ट घडली की, ताबडतोब ती आपल्यापर्यंत पोहोचते. गॅस सिलिंडरचा नंबर लावण्यापासून घरगुती कोणतेही बिल भरण्यासाठी, स्पर्धा परीक्षांचा फार्म भरण्यापासून सोशल मिडिया वापरण्यापर्यंतची सर्वच कामे घरच्या घरी हातातल्या मोबाईल, टॅब या साधनांमुळे सहज शक्य होत आहेत. साधारणपणे १२-१५ वर्षापूर्वी सायबर कॅफे नावाची संकल्पना रूढ होऊ लागली.
सायबर कॅफे ही संकल्पना आपल्याकडे फारशी माहिती नव्हती. इंटरनेट म्हणजे खूब काही तरी गंभीर, अवघड, आपल्या कार्यकक्षेच्या बाहेरील गोष्ट असेच बोलले जात होते.
परंतु, हळूहळू शिक्षण, सामाजिक, आर्थिक आदी सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचा शिरकाव होऊ लागला. त्यानंतर सायबर कॅफेची गरज वाढल्याने शहरात ठिकठिकाणी सायबर कॅफे उघडण्यात आले.
गेम, सोशल नेटवर्किंग साईट्स, त्यावर आधारित कलाकृती, शैक्षणिक अभ्यासक्रम वाढत गेले तसे समाजात इंटरनेटबाबत अधिक माहिती होत गेली.
सायबर कॅफे विद्यार्थी, तरूणांच्या गर्दीने फुलून जात होते. महाविद्यालय प्रवेश असो, अभियांत्रिकीचा कॅप राऊंड असो, एसटी किंवा रेल्वेचे आरक्षण असो प्रत्येक गोष्टीच इंटरनेटची पर्यायाने इंटरनेट कॅफेची गरज भासू लागली. त्याच दरम्यान, आपल्याकडे मोबाईल विकसित होत गेला.
सुरूवातीला मोबाईलही महागडे होते, मात्र, नंतर मोबाईल निर्मिती जगतात विविध कंपन्यांनी शिरकाव केल्याने सर्वसामान्यांना परवडेल अशा मोबाईलची निर्मिती झाली आणि प्रत्येक घरात मोबाईलने प्रवेश केला. आता तर स्मार्टफोनही परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होत असल्याने फेसबुक, ट्विटरसारखे सोशल साईट्स मोबाईलवरच उपलब्ध झाले आहे. पर्यायाने इंटरनेटची सुविधा मोबाईलवर मिळत असल्याने अनेक शैक्षणिक कामेही मोबाईलवर होत असल्याने सायबर कॅफेत तासनतास घालविणारा विद्यार्थी आता घरबसल्या मिळेल त्या रिकाम्या वेळेत मोबाईलचा वापर करू लागला आहे. मोबाईलने जग जवळ आणले तर इंटरनेटने जग सोडले आहे. त्यामुळे सायबर कॅफेची गरज आता तेवढी भासत नसून हातातच तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Smartphone brings cyber cafes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.