सागवान झाडांची कत्तल !
By Admin | Updated: April 20, 2016 00:54 IST2016-04-20T00:54:53+5:302016-04-20T00:54:53+5:30
कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आंबागड किल्ला लगतच्या जंगलात राजरोसपणे सागवान झाडाची कत्तल होत असून जंगलाचे रक्षक पैसे घेऊन भक्षकच बनले आहे.

सागवान झाडांची कत्तल !
जंगलातील रक्षकच बनले भक्षक : जंगलाचे अस्तित्व धोक्यात,कांद्री वनपरिक्षेत्रातील प्रकार
विलास बन्सोड उसर्रा
कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आंबागड किल्ला लगतच्या जंगलात राजरोसपणे सागवान झाडाची कत्तल होत असून जंगलाचे रक्षक पैसे घेऊन भक्षकच बनले आहे.
आंबागड किल्ल्या या पायथ्याशी अनेक झाडे आहेत. त्यापैकी मौल्यवान असलेल्या सागवान झाडे जास्तच आहेत. २३ मार्च पासून सदर जंगलात सागवान झाडाची कत्तल करणारी टोळी सक्रीय झाली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
जंगलातील गट क्रमांक ३५७ च्या सीमेवर एक सागवन वृक्ष ज्याचा आकार अडीच फुट गोलाई व अंदाजे २२ फूट लांब इतका मौल्यवान सागवनाची कत्तल करताना आंबागड येथील देवस्थानचे पुजारी विश्वनाथ शरणागते यांना दिसले.
सदर घटनेची माहिती कुणी अज्ञात व्यक्तीने वनविभाग कांद्री यांना कळविले. त्यानंतर वनरक्षक घटनास्थळी आले. पण त्यांनी साधा पंचनामा केला नाही.
झाडाची कत्तल करणाऱ्या व्यक्तीकडून चार हजार रुपये घेऊन प्रकरण मिटविले.
सध्या जंगलात आतापर्यंत किती झाडाची कत्तल झाली असेल याची कल्पना करणे अशक्य आहे. पण वनअधिकारी मात्र मुग गिळून गप्प बसले आहेत. सदर सागवान झाडाची सखोल चौकशी करण्याची मागणी विश्वनाथ शरणागते व वनप्रेमींनी दिली आहे.