अकुशल मजुरांकडून ‘कुशल कामे’
By Admin | Updated: March 22, 2015 01:34 IST2015-03-22T01:34:47+5:302015-03-22T01:34:47+5:30
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून बाहेर पडलेल्या अनेकांचे हात कामासाठी भटकंती करीत असताना कुठेही शिक्षण न घेतलेले धानोरी गावातील अकुशल कामगार

अकुशल मजुरांकडून ‘कुशल कामे’
अशोक पारधी पवनी
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून बाहेर पडलेल्या अनेकांचे हात कामासाठी भटकंती करीत असताना कुठेही शिक्षण न घेतलेले धानोरी गावातील अकुशल कामगार सिमेंटच्या वापराशिवाय धरणाचे कालव्याला संरक्षित करण्यासाठी दगडी काळीचे पिचींग करण्याचे कौशल्याचे काम करीत आहेत.
२० ते २५ वर्षापूर्वीपर्यंत धानोरी गाव दगडांच्या खाणीसाठी प्रसिद्ध होते. जुन्या घरांच्या पायऱ्यासाठी व विहीरींच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले दगड याच गावातील खाणीतून बाहेर पडलेले होते. कित्येक रस्त्यांच्या खडीकरणासाठी येथील गिट्टी, बोल्डर वापरण्यात आलेले आहे. तलाव व उजवा कालवा यामध्ये दगडांच्या खाणी नामशेष झाल्या. कित्येकाचा रोजगार संपुष्टात आला.
खाणीतील मोठे दगड घणाचे साहाय्याने फोडून त्याला चौकोनी आकार देण्याचे काम याच गावातील मजूर करीत असत आता ते काम राहिलेले नाही. परंतू फोडलेले दगड सिमेंटच्या वापराशिवाय जोडण्याचे तंत्र त्याच कालावधीत काही कुटूंबांनी अवगत केले. त्यांचे हे तंत्र वापरून धरणाची भिंत, तलावाची पाळ असो की कालव्याची पाळ ढासळण्यापासून संरक्षित करण्यासाठी दगडी फळींचा वापर करून संरक्षित केल्या जाते. अशा कोणत्याही कामासाठी धानोरी गावातील मजूरांना प्राधान्य दिल्या जातो. शासन दरबारी हे अकुशल काम असल्याने अवघे ३ रूपये चौरस फुटाप्रमाणे मजूरी दिल्या जाते. महागाईचा विचार करता उन्हातान्हात करावयाच्या या कामाचे दर वाढविल्या जावेत, असे मजूरांना वाटत आहे.