सहा हजाराची दारू केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:33 IST2021-04-13T04:33:52+5:302021-04-13T04:33:52+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असताना दारू विक्रीस बंदी आहे, तरीदेखील मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. यावर चिचगड ...

सहा हजाराची दारू केली जप्त
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असताना दारू विक्रीस बंदी आहे, तरीदेखील मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. यावर चिचगड पोलिसांनी गावात ९ एप्रिल रोजी रात्री ११.४५ वाजता आरोपीच्या घरावर धाड घालून माजघरातील कोपऱ्यात एका पोत्यात ठेवलेल्या दोन हजार ८८० रुपये किमतीच्या १८० मिलीच्या देशीदारूच्या ४८ बॉटल्स जप्त केल्या. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मनोहर इस्कापे यांनी केली आहे. दुसरी कारवाई १० एप्रिल रोजी मध्यरात्री करण्यात आली असून, आरोपीच्या घरातील स्वयंपाकखोलीत एका कोपऱ्यात प्लास्टिक थैलीत ठेवलेल्या एक हजार ८०० रुपये किमतीच्या देशीदारूच्या ३० बॉटल्स पोलिसांनी जप्त केल्या. तर तिसरी कारवाई १० एप्रिल रोजी मध्यरात्री करण्यात आली. आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता छपरीत एका पिशवीत ठेवलेल्या एक हजार ६८० रुपये किमतीच्या देशीदारूच्या २८ बॉटल्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तिघांवर चिचगड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलीस कंबर कसून आहे.