अपघातात सहा जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:19 IST2018-10-09T22:19:33+5:302018-10-09T22:19:53+5:30
परस्पर विरुध्द दिशेने येणाऱ्या मारुती व्हॅन आणि दुचाकीची टक्कर होवून व्हॅनमधील चार जण तर दुचाकीवरील दोन जण असे सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मोहाडी-तुमसर मार्गावरील ग्रिनव्हॅलीसमोर सोमवारी रात्री ९.३० वाजता घडला.

अपघातात सहा जण गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : परस्पर विरुध्द दिशेने येणाऱ्या मारुती व्हॅन आणि दुचाकीची टक्कर होवून व्हॅनमधील चार जण तर दुचाकीवरील दोन जण असे सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मोहाडी-तुमसर मार्गावरील ग्रिनव्हॅलीसमोर सोमवारी रात्री ९.३० वाजता घडला.
मोहाडी येथील औषध विक्रेता विनोद सव्वालाखे (४५) हे तुमसरवरुन मारुती व्हॅन क्रमांक एम एच ३६ एच ६७१५ ने मोहाडीकडे येत होते. तर पवन डोंगरे (३४) व सावंत डोंगरे (२८) रा. खरबी हे दोघे आपल्या दुचाकीने खरबीकडे जात होते. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास या दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. त्यात पवन व सावंत डोंगरे यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. तर मारुती व्हॅनचे संतुलन जावून ती बारच्या भिंतीवर आदळली. त्या व्हॅनमधील वासुदेव सव्वालाखे (७०), संगीता विनोद सव्वालाखे (३६), गौरव सव्वालाखे (११) यांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. यात व्हॅनमध्ये प्रवास करणाºया ९ वर्षाच्या मुलाला मात्र सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. जखमींना तात्काळ मोहाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सर्व जखमींना भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले.