टँकर-कमांडर अपघातात सहा प्रवासी जखमी
By Admin | Updated: October 18, 2014 01:02 IST2014-10-18T01:02:40+5:302014-10-18T01:02:40+5:30
डिझेल वाहून नेणारा टँकर व कमांडर यांच्यात आमोरासमोर झालेल्या धडकेत सहा प्रवासी जखमी झाले. यातील एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक ...

टँकर-कमांडर अपघातात सहा प्रवासी जखमी
तुमसर : डिझेल वाहून नेणारा टँकर व कमांडर यांच्यात आमोरासमोर झालेल्या धडकेत सहा प्रवासी जखमी झाले. यातील एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित पाच जखमींवर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात तुमसर-कटंगी राज्य मार्गावरील वळणावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला. अपघात स्थळावरून मतमोजणी केंद्र हाकेच्या अंतरावर आहे. डिझेल भरलेला टँकर असल्याने मोठा अर्थ टळला.
डिझेल टँकर खापरी नागपूरवरून गोबरवाहीकडे जात होता तर ट्रक एम.एच.३१/डी.एस.२८४ तर कमांडर गोबरवाहीकडून तुमसरकडे येत होती. एम.एच.३५/ई.०००२ आंबेडकर वॉर्डातील पॉवर हाऊस वळणावर अनियंत्रित टँकर कमांडरला जोरदार धडक दिली. यातील सहा प्रवाशी मिताराम शेंडे (६५) रा. ताडगाव, अॅमी डिसुझा (३४) रा. तुमसर, कमल जाऊळकर (७६) रा. चिचोली, नत्थू कडूकर (४०) रा.भंडारा, राजेश मेश्राम (३५) रा. मिटेवानी, हरीचंद्र नगरे (४५) रा. पवनारा जखमी झाले. अपघातातील मिताराम शेंडे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.
तुमसर विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम यंत्र शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ठेवली आहेत. येथून अपघात स्थळ १०० मीटर अंतरावर आहे. डिझेल टँकर भरला असल्याने अपघातानंतर मोठा अनर्थ टळला. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की ट्रकचा वेग अतिशय जास्त होता. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक नागरिकांनी त्या चालकाचा पाठलाग केला, परंतु चालक ग्रामस्थांच्या हाती लागला नाही. जखमींना स्थानिक सामाजिक कार्यकर्ता मीरा भट, कैलाश जोशी व इतरांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. ट्रँकरमध्ये सुमारे १३ हजार लिटर डिझेल भरला आहे. ट्रँकरवर एम.व्ही. कापगते साकोली असा संपर्काचा पत्ता लिहिला आहे. तणस पोलीस उपनिरीक्षक मेसरे करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत टँकर चालकाला अटक झाली नव्हती. (तालुका प्रतिनिधी)