शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

रेल्वेस्थानकावर सहा किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:52 IST

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाने जेरबंद करुन त्यांच्याजवळून सहा किलो गांजा जप्त केला, ही कारवाई भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे सुरक्षा दलाने केली. जमशेद अब्दुल हमीब (४५) व मोहम्मद अली सत्तार अली (४०) अशी अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत.

ठळक मुद्देदोघांना अटक : भंडारा रोड रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाने जेरबंद करुन त्यांच्याजवळून सहा किलो गांजा जप्त केला, ही कारवाई भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे सुरक्षा दलाने केली.जमशेद अब्दुल हमीब (४५) व मोहम्मद अली सत्तार अली (४०) अशी अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत. नागपूर येथील मंडळ सुरक्षा आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या सूचनेवरुन भंडारा रोड रेल्वे सुरक्षा दलाने गोंडवाणा एक्सप्रेसमधील प्रवाशांवर पाळत ठेवली. पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात कारवाई सुरु होती. दरम्यान तिकीट निरीक्षकांना या दोघांची विचारपूस केली असता त्यांच्याजवळ असलेल्या थैल्या लपविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावरुन त्या दोघांना पकडण्यात आले. त्यांना भंडारा रोड रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळ असलेल्या थैल्यांची तपासणी केली असता प्लास्टिकचे बंद पॅकेट आढळून आले. त्यात सहा किलो गांजा आढळून आला. या दोघांजवळ रायपूर ते निझामूद्दीन प्रवासी तिकीट होते. सदर गांजा रायपूर येथून खरेदी केला असून दिल्ली येथे विकण्यासाठी नेत असल्याची कबूली त्यांनी दिली. वर्षभरातील ही दुसरी घटना असून गत वर्षी एका इसमाजवळून दहा किलो गांजा पकडण्यात आला होता.पोलीस निरीक्षक अनील पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विवेक मेश्राम, जयसिंग, अरविंद टेंभुर्णेकर, भुपेश देशमुख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस