शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात दोन अपघातांत सहा जखमी : एका कुटुंबावर काळाचा घाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:28 IST

साकोली आणि वरठीजवळ घडल्या दोन घटना : सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये ६ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. विशेष म्हणजे, यात एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे, तर अन्य अपघातांमध्ये दोन दुचाकीचालक गंभीर जखमी झाले आहे. यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मुंडीपार (सडक) गावाजवळ कार-दुचाकी अपघातामध्ये पती-पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी झालीत, तर दुसऱ्या घटनेत वरठीजवळील सॅनफ्लॅग बायपास पुलावर कारची दोन दुचाकीस्वारांना धडक बसल्याने दोघेही जखमी झाले.

साकोली प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातून जाणाऱ्या ५३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील मुंडीपार (सडक) गावाजवळ कार व दुचाकीत भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीसह दोन लहान मुले असे चौघेही गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान घडली. जखमींवर साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूरवरून रायपूरकडे जात असलेल्या सीजी १२ बीई ८१६१ क्रमांकाच्या कारने याच मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीला (एमएच ४० एएस ४४६८) जोरदार धडक दिली. या दुचाकीवरून आई, वडील आणि दोन लहान मुली प्रवास करत होते. धडक बसल्याने चौघेही गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख राधेश्याम मुंगमोडे, नरेंद्र वाडीभस्मे, युवासेनेचे पुष्कर करंजेकर व रितिक तिडके यांनी धाव घेतली. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मदतीचे कौतुकया अपघाताची माहिती मिळताच साकोली उपतालुका प्रमुख सचिन घोनमोडे यांनी सर्व जखमींना साकोली रुग्णालयात पोहोचवून वैद्यकीय मदत मिळवून दिली. साकोली पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून तपास पोलिस निरीक्षक आचरेकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

वरठी उड्डाणपुलावर कारने दोन दुचाकीस्वारांना उडविलेअपघाताची दुसरी घटना वरठीजवळील सॅनफ्लॅग बायपास पुलावर घडली. या पुलावरून येणाऱ्या भरधाव कारने दोन दुचाकीस्वरांना जोरदार धडक दिली. यात पोलिस कर्मचाऱ्याचा पाय, तर दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात सोमवारी, सायंकाळी ४:४० वाजताच्या दरम्यान घडला. भंडारा पोलिस मुख्यालयात कार्यरत चंदन चकोले (वय ३५) हे भंडाराकडे, तर भंडारा येथील हेमंत धार्मिक (३६) हे मोहाडीच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. दरम्यान, सॅनफ्लॅग बायपास पुलावरून भंडाराच्या दिशेने जाणारी मारुती व्हॅन अनियंत्रित होऊन दोन्ही दुचाकींना एकाच वेळी धडक बसली. यात पोलिस कर्मचाऱ्याच्या पायाला व धार्मिक यांच्या डोक्याला जबर मार लागला. जखमींना पोलिसांनी तत्काळ भंडारा रुग्णालयात खाना करण्यात आले.

बायपास रस्ता ठरतोय मृत्यू मार्गसॅनफ्लॅग कंपनी ते पाचगाव फाटा हे ५०० मीटरचे अंतर वाहन चालकांचा कर्दनकाळ ठरला आहे. पुलावरून चढताना असलेले असंख्य चढउतार व रस्त्याचा भाग समतोल नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. रहदारीचा एकमेव व वर्दळीच्या रस्त्याची खराब हालत वाहन चालकांकरिता मृत्युमार्ग ठरली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराAccidentअपघात