सहा दिवसात काेराेनाचे २६ बळी, ४,७४० पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST2021-04-07T04:36:17+5:302021-04-07T04:36:17+5:30
मंगळवारी ५,९२२ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले हाेते. त्यात भंडारा तालुका ३६९, माेहाडी ११०, तुमसर ९५, पवनी ९३, ...

सहा दिवसात काेराेनाचे २६ बळी, ४,७४० पाॅझिटिव्ह
मंगळवारी ५,९२२ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले हाेते. त्यात भंडारा तालुका ३६९, माेहाडी ११०, तुमसर ९५, पवनी ९३, लाखनी ९८, साकाेली ६६, लाखांदूर ३७ असे ८६८ काेराेनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात आता काेराेनाबाधितांची संख्या २२ हजार ३८५ झाली आहे. त्यापैकी १६ हजार १२ व्यक्तींना काेराेनावर यशस्वी मात केली आहे तर, ६,००४ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात भंडारा तालुक्यात २,६८७, माेहाडी ६५०, तुमसर ७५८, पवनी ७५६, लाखनी ६२८, साकाेली ३११, लाखांदूर २१४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बाॅक्स
तब्बल आठ जणांचा मृत्यू
साेमवारी काेराेनाने नऊ जणांचा बळी गेल्यानंतर मंगळवारी पुन्हा आठ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा तालुक्यातील चार, पवनी तालुक्यातील तीन आणि तुमसर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील ५५ वर्षीय महिला व ४४ वर्षीय पुरुषाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला तर, ७० वर्षीय आणि ७२ वर्षीय वृद्धांचा भंडारा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पवनी तालुक्यातील ६० वर्षीय महिला, ५६ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि तुमसर तालुक्यातील एका ५६ वर्षीय महिलेचा रुग्णालयात आणताना वाटेतच मृत्यू झाला. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
बाॅक्स
काेराेना चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात रांग
काेराेना संसर्गाचा स्फाेट हाेत असल्याने लक्षणे आढळणारे व्यक्ती काेराेना चाचणी करून घेत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी तर चाचणीसाठी लांबच लांब रांग लागल्याचे चित्र दिसत हाेते. जिल्हा रुग्णालयातील टी.बी. वाॅर्डमध्ये चाचणीसाठी नाेंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे सकाळी १० वाजतापासून माेठी रांग लागल्याचे दिसत हाेते. येथे काेणतेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन हाेताना दिसत नव्हते. अनेक रुग्ण गर्दी करून रांगेत उभे हाेते.