सहा जोडपे विवाह बंधनात अडकली
By Admin | Updated: May 19, 2016 00:34 IST2016-05-19T00:34:38+5:302016-05-19T00:34:38+5:30
वेळेची व पैशाची बचत व्हावी या उद्देशाने सर्वधर्मीयांमध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो.

सहा जोडपे विवाह बंधनात अडकली
मुस्लीम निकाह कमेटीचा उपक्रम : मुस्लीम लायब्ररी सभागृहात पार पडला शुभविवाह
भंडारा : वेळेची व पैशाची बचत व्हावी या उद्देशाने सर्वधर्मीयांमध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. यात शहरातील मुस्लीम बांधवांनीही सामूहिक विवाह सोहळ्यातून सहा जोडप्यांना विवाह बंधनात अडकविले. हा स्तुत्य उपक्रम मुस्लीम निकाह कमेटीच्या माध्यमातून भंडारा शहरात पार पडला.
स्थानिक मुस्लीम लायब्ररी सांस्कृतिक सभागृहात मुस्लीम निकाह कमेटीच्या माध्यमातून मुस्लीम समाजातील युवक युवतींचा हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला आमदार रामचंद्र अवसरे, विवाह कमेटीचे अध्यक्ष सय्यद सोहेल, तारिक कुरैशी, विकास मदनकर, अरफात खान, मुफ्ती साजीद, फरहान खान, शकिबउद्दीन खान, अबरारउद्दीन खान, जुनेद अख्तर, ईरशाद खान, रिजवान खान, अनिक जमा, रिजवान खान, तनवीर खान, साबीर शेख, शादाब पाशा, जुनैद खान, अवेश खान, अमजद खान आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी आमदार अवसरे यांनी नवविवाहितांना एक सिलाई मशीन भेट देऊन भविष्यात उदरनिर्वाह करून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शुभाशीर्वाद दिले.
मुस्लीम निकाह कमेटीचा हा दहावा सामूहिक विवाह सोहळा होता. यापूर्वी २०१५ मध्ये १४ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहे. कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
सामूहिक वर्गणीतून कार्यक्रमाला हातभार
सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी मुस्लीम निकाह कमेटीशी जुळलेल्या ४५ सदस्यांनी प्रत्येकी प्रतीवर्षी १००० रुपये वर्गणी जमा केली. या उपक्रमातून हा सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. विवाहित जोडप्यांना पलंग, गादी, आलमारी, कपडे तसेच जीवनोपयोगी वस्तू भेट स्वरुपात देण्यात आले. पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था केली.