गाव रक्षणाकरिता तरूणाईने हातात घेतली काठी

By Admin | Updated: May 7, 2017 00:18 IST2017-05-07T00:18:33+5:302017-05-07T00:18:33+5:30

केव्हा कुठे, काय घडेल याचा नेम नसतो, म्हतात ते खरच आहे. मागील पाच दिवसांपासून पालांदूर परिसरात चोरांच्या दहशतीचे वातावरण तयार झाले असून ...

Sitting in the woods for the protection of the village | गाव रक्षणाकरिता तरूणाईने हातात घेतली काठी

गाव रक्षणाकरिता तरूणाईने हातात घेतली काठी

चोरांच्या दहशतीने जागतात ग्रामस्थ : शेतकरी, प्रवाशांना रात्रीचा प्रवास धोकादायक
मुखरू बागडे । लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : केव्हा कुठे, काय घडेल याचा नेम नसतो, म्हतात ते खरच आहे. मागील पाच दिवसांपासून पालांदूर परिसरात चोरांच्या दहशतीचे वातावरण तयार झाले असून अरणे ग्रामस्थ जागून रात्र काढत आहेत. यामुळे शेतशिवारात, मुख्य रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची अक्षरश: तपासणी नागरिकच करताना दिसत आहेत.
पालांदूर पोलीस स्टेशनअंतर्गत तई येथे निलकंठ बागडे यांच्या घरी अज्ञात व्यक्तीने चोरी करीत रोख व दागीने चोरले. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने ५०-६० कि़मी. च्या परिसरात पसरली.
तेव्हापासून चोऱ्यांच्या दहशतीने नागरिक, पोलीस विभाग सतर्क झाले असून डोळ्यात तेल टाकून गावाच्या रक्षणाकरीता तईणाई पुढे आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजींच्या स्वप्नातील तरून खऱ्या अर्थाने आज गावाकरीता समर्पीत पहायला मिळत आहे.
मऱ्हेगाव, ढिवरखेडा, मेंगापूर, पालेपेंढरी, घोडेझरी, तिरखुरी, किटाडी, वाकल आदी गावात चोरांची मोठी भिती निर्माण झाली असून पोलीस विभागावर जनतेचा रोष व्यक्त होत आहे. सोशन मिडीयावरून चोरांची माहिती वायरल झाली असून शेतातील जिल्ह्यातील एका विशिष्ट समाजाचे चोरी करणाऱ्या व्यस्त असल्याचे म्हटले आहे. यामुळे गावा गावात दहशत आणखीच वाढली असून भितीपोटी लोक घराबाहेर पडताना घाबरत आहेत.
चोरटे दिवसालाच घरांची माहिती घेत रात्रीला चोरीचे काम फत्ते करतात, अशी चर्चा पानठेल्यातून, केशकर्तनालयातून चर्चीली जात आहे. स्टोदुरूस्ती, किचन सामान विक्री करण्याच्या बहान्याने चार चाकीतून, मोटार सायकल मधून येतात.

पालांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वच गावात रात्र दिवसाला गस्त वाढविली आहे. अनोळखी व्यक्ती दिसताच पोलीस स्टेशन, बिट जमादार, ठाणेदार यांच्या भ्रमणध्वनीवर कळवावे. तई येथील चोरी प्रकरणानंतर पालांदूर पोलीस ठाणे हद्दीत चोरी झालेली नाही. नागरिकांची घाबरून जाऊ नये नाहक रात्रीला ये-जा करणारे लग्नाचे वऱ्हाडी किंवा शेतात जाणारे शेतकरी यांना चोर समजून गैरकृत्य करू नये.
-मनोज वाढीवे, ठाणेदार पालांदूर.
मेंगापूर पालांदूर येथे शुक्रवारला भरदुपारी कथ्थ्या रंगाच्या चार चाकीने चौघेजण शरीरयष्ठीने धष्टपुष्ट तरूण प्रेसर कुकर सोबत घेत आवाज न देता घरात घुसुन महिलांना विश्वासात घेवून घराची नकळत पाहणी करीत होते. शेजाऱ्यांनी चोर चोर ओरडताच चारही तरूण कारने पळून गेले.
-बाळकृष्ण शेंडे, मेंगापूर रहिवासी.

Web Title: Sitting in the woods for the protection of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.