भगिनी निवेदिता महिला वसतीगृह कुणासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 00:31 IST2016-10-17T00:31:35+5:302016-10-17T00:31:35+5:30
लाखनीनगरातील ग्रामीण क्षेत्रातील गरीब होतकरू विद्यार्थींना मुक्कामाने राहून उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी वसतीगृहाची स्थापना करण्यात आली,...

भगिनी निवेदिता महिला वसतीगृह कुणासाठी?
लाखनीतील प्रकार : युजीसी निधीची चौकशीची मागणी
लाखनी : लाखनीनगरातील ग्रामीण क्षेत्रातील गरीब होतकरू विद्यार्थींना मुक्कामाने राहून उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी वसतीगृहाची स्थापना करण्यात आली, परंतु महाविद्यालयाच्या मूळ उद्देशापासून प्राचार्य यांनी वसतिगृहाची इमारत महाविद्यालय आणि कार्यक्रम घेण्याकरिता वापरत आहेत. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीचा गैरवापर करताना प्रकर्षास येत आहे. याबाबद चौकशी व्हावी, अशी मागणी महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थी तसेच नागरिकांनी केली आहे.
समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील प्राचार्य यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थेने निलंबित केले आहे, हे प्रकरण तव्यावर असतांना समर्थ महाविद्यालयात उभे असलेले 'भगिनी निवेदिता महिला वसतिगृह' या वस्तीगृहाचे उद्घाटन ७ जानेवारी २०१३ ला अनेक महानुभाव पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या वस्तीगृहासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १० व्या आयोगाकडून ८० लाख रुपये मिळाले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीतून दुमजली इमारत समर्थ महाविद्यालय लाखनी येथे मोठ्या दिमाखात उभी आहे. परंतु तीन वर्षे लोटली तरीपण 'भगिनी निवेदिता महिला वसतिगृह' मध्ये विद्यार्थिनींना राहण्यास प्रवेश दिला गेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ८० लाख रुपये निधी खर्च करून बांधल्या गेलेली इमारत आता वर्ग खोली, समारंभ, आणि लग्न-रिसेप्शनसाठी किरायाने दिली जात आहे. महाविद्यालयातील दिवसांमध्ये सभागृह किरायाने दिला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्याथ्यार्नी अनेकदा प्राचार्यांना तोंडी सूचना केल्या तरीही काहीही तोडगा काढण्यात आला नाही. युजीसीच्या अनुदानातून तयार झालेल्या वस्ताीगृहाचे व्यवसायिकीकरण होत आहे. दर शनिवारी आणि रविवारला वसतिगृहाची इमारत बुक असते, ही शोकांतिका आहे. (शहर प्रतिनिधी)