शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, काय बी करा आमाले मदत करा, मोठ्या सायबाले सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 17:15 IST

पुरात जीव वाचला पण घरातील किडूक-मिडूक वाहून गेलं, आता खायचेही वांदे आहे. साहेब, हात जोडून विनंती, काय बी करा, आमा गरीबाले मदत करा, मोठ्या सायबाले सांगा आमी कसे रायतो ते.

ठळक मुद्देमांगगारुडी वस्तीतील वास्तव दररोज जगण्याचा संघर्ष करणाऱ्या झोपड्यातील कुटुंबाना अद्यापही मदत नाहीवैनगंगेच्या महापूराचा फटका

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काय सांगू साहेब, पुरात झोपडीत होतं नव्हतं ते सर्व वाहून गेलं. दहा वर्षात काडी-काडी जमवत चिमणीसारख घरट बांधलं. पुरात जीव वाचला पण घरातील किडूक-मिडूक वाहून गेलं, आता खायचेही वांदे आहे. साहेब, हात जोडून विनंती, काय बी करा, आमा गरीबाले मदत करा, मोठ्या सायबाले सांगा आमी कसे रायतो ते, असे सांगत हमसून हमसून रडत महापूराची व्यथा मांगगारोडी समाजाच्या वस्तीतील महिला सांगत होत्या. महापूर उलटून आता २० दिवस झाले तरी कुणी मदतीसाठी धावून आले नाही. आजही ही मंडळी उघड्यावर असल्याचे वास्तव ‘लोकमत’ ने केलेल्या रियालीटी चेकमध्ये पुढे आले.

वैनगंगा नदीच्या विशाल पात्रालगत कारधा परिसरात मांगगारुडी समाजाची वस्ती आहे. गत तीस वर्षांपासून ही मंडळी मिळेत ते काम करीत या ठिकाणी वास्तव्याला आहेत. भटक्या समाजाची ही मंडळी झोपड्या करुन राहतात. दररोज आपल्या तान्हुल्यांना घेऊन भंडारा शहरात रोजगारासाठी भटकतात. कुणी मणी बेसर विकतात तर पुरुष मंडळी मिळेल ते काम करतात. कोरोना संकटाच्या महामारीतही या वसाहतीत कोरोना पोहोचला नाही. ते सर्वांसाठी समाधान आहे. सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असताना २९ आॅगस्टच्या रात्री वैनगंगा कोपली आणि एका विशाल लाटेत संपूर्ण झोपडपट्टी वाहून गेली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र आता मरणापेक्षाही अधिक यातना घेवून येथील मंडळी जगत आहे. शासन आणि प्रशासनाने वाऱ्यावर सोडलेल्या या झोपडपट्टीतील मंडळीचे विदारक वास्तव पाहून कुणाच्याही डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहत नाही.

या झोपडपट्टीतील रहिवासी शिवा कांबळे म्हणाले, नदीकाठावर आमची वस्ती आहे, ना रोजगार ना हक्काचे घर, दररोज दोन घासासाठी आमचा संघर्ष सुरु असतो. पुराने आमची घरे उद्ध्वस्त झाली. शासनाने आमचे पुनर्वसन करावे, आम्हाला घरे बांधून द्यावी, असे सांगत चिमुकल्यांची अन्नासाठी होणारी तडफड पाहावत नाही, असे त्याने सांगितले.रंजू शेंडे, मोनिका पूर्वले, जॉकी लोंढे, बारुबाई गायकवाड, दशमाबाई शेंडे, सुबी दुनाडे यांनी पुरानंतरची व्यथा सांगितली तेव्हा त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. त्या म्हणाल्या, पुराच्यावेळी ग्रामपंचायतीने चार पाच दिवस खाण्यापिण्याची सोय केली. त्यानंतर काही मंडळीनी धान्य आणून दिले. परंतू ही मदत आता संपली आहे. कोरोनामुळे गावात रोजगार मिळत नाही. लहान मुलांची अन्नासाठी तडफड होत आहे. शासनाचे माणसं आली पाहणी करुन धीर देवून गेली. मात्र अद्याप एक रुपयाची मदत आली नाही. एक किलोही धान्या मिळाले नसल्याचे या महिलांनी सांगितले.वस्तीत वीज नाही, रस्त्यावरच झोपतोवैनगंगा नदीला आलेल्या पुराने अनेक झोपड्यात पाणी शिरले. काही झोपड्या वाहून गेल्या. पुरग्रस्तांना प्रकाश हायस्कूलच्या पटांगणात आश्रय देण्यात आला. परंतु शाळा व्यवस्थापनाने हात वर केले. त्यामुळे ही मंडळी पुन्हा उद्ध्वस्त झोपड्यात राहायला आली. वीजेचा पत्ता नाही, सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा कायम धोका असतो. त्यामुळे अनेकजण आता जवळच असलेल्या डांबरी रस्त्यावर रात्री झोपतात. शासनाने झोपड्या बांधून निवासाची व्यवस्था तरी करावी, अशी मागणी पूरग्रस्तांनी केली.

५० रुपयांसाठी दिवसभर वणवणमहापुरात उद्ध्वस्त झालेले प्रभू पाथरे सांगत होते, दोन म्हशी, दोन शेळ्या पुरात वाहून गेल्या स्वत:चा जीव कसाबसा वाचला. पण जित्राबाला नाही वाचवू शकलो. जगण्याचे साधनच गेल्याने आता करावे तरी काय, पन्नास रुपयांसाठी वणवण भटकंती करतो. पण तेही मिळत नाही. सायंकाळी जेवायला मिळेल की नाही याचीही शास्वती नसते.

टॅग्स :floodपूर