शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

साहेब, खूप अर्जंट काम आहे, जावंच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 05:00 IST

भंडारा विभागांतर्गत सहा आगार असून, ३८१ बसेस आहेत. मात्र, संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवेसाठी सध्या ८ बसेस चालविल्या जातात. अत्यल्प उत्पन्नात या बसेस चालत असून, दररोज ३०० ते ४०० प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. गोंदिया-नागपूर, भंडारा-नागपूर अशी बससेवा सद्य:स्थितीत सुरू आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी या बसने प्रवास करतात. मात्र, काही प्रवासीही बसस्थानकावर येऊन बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात.

ठळक मुद्देएसटी प्रवाशांची तीच ती कारणे : अत्यावश्यक सेवेला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साहेब, खूप अर्जंट काम आहे. नागपूरला जावेच लागेल. जवळच्या नातेवाइकाचे निधन झाले आहे. मित्राची आई आजारी आहे, तिच्यासाठी औषधे आणण्यासाठी जाणे गरजेचे आहे, माझी वैद्यकीय तपासणी करायची आहे, अशी एक ना अनेक कारणे सांगून एसटी बसमधून प्रवास करण्याचा प्रयत्न सध्या सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. तसेही भंडारा विभागात संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेला अत्यल्प प्रतिसाद दिसत आहे. भंडारा विभागांतर्गत सहा आगार असून, ३८१ बसेस आहेत. मात्र, संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवेसाठी सध्या ८ बसेस चालविल्या जातात. अत्यल्प उत्पन्नात या बसेस चालत असून, दररोज ३०० ते ४०० प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. गोंदिया-नागपूर, भंडारा-नागपूर अशी बससेवा सद्य:स्थितीत सुरू आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी या बसने प्रवास करतात. मात्र, काही प्रवासीही बसस्थानकावर येऊन बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी वाहकासोबत त्यांचा वादही होतो. अतिशय महत्त्वाचे काम आहे असे सांगून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, तोही दिवसातून एक-दोनदाच अनुभव येतो. विशेष म्हणजे बसस्थानकावर प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्कॅनिंग करावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य यंत्रणेला पत्र दिले आहे. परंतु, अद्यापही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी विना स्कॅनिंगनेच प्रवास करताना दिसून येतात. यामुळे कुणी आजारी प्रवासी असल्यास संपूर्ण बसच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भंडारा विभागाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

तीच ती कारणेराज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा आहे. त्यासाठी त्यांना आयकार्ड दाखविणे गरजेचे आहे. परंतु, असे असतानाही काही प्रवासी बसस्थानकावर येतात. विविध कारणे सांगून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यांना रोखण्यात येते. अनेकदा प्रवाशांची निकड पाहून प्रवास करण्याची मुभाही दिली जाते. परंतु, अत्यल्प प्रवाशांमुळे अशी संख्या कमी असते.

नागपूर मार्गावर गर्दीभंडाराहून नागपूर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची सकाळी ८ वाजल्यापासून बसस्थानकावर वर्दळ दिसते. अनेक प्रवासी दररोज शासकीय कामाच्या निमित्ताने नागपूरला जातात. तसेच सायंकाळी परत येतानाही गर्दी दिसून येते. बसमध्ये केवळ २२ प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. तेवढे प्रवासीही सध्या मिळणे कठीण झाले आहे. अनेकांनी आता खासगी वाहनांचा आधार घेतला असून, एसटीकडे पाठ फिरविली आहे.

थर्मल स्कॅनिंगचा अभावअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासापूर्वी थर्मल स्कॅनिंग करणे बंधनकारक आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने जिल्हा प्रशासनाला थर्मल स्कॅनिंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु, अद्यापही येथे थर्मल स्कॅनिंग होत नाही. त्यामुळे केवळ ओळखपत्र पाहूनच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसमध्ये प्रवेश देण्याशिवाय पर्याय नाही. 

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा आहे. दररोज ३०० ते ४०० प्रवासी प्रवास करीत आहेत. संचारबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक सहसा प्रवास करीत नसल्याचे चित्र आहे. वाद होतात, परंतु त्यांना स्पष्टपणे समजावून सांगितले जाते. थर्मल स्कॅनिंगसाठी प्रशासनाकडे मागणी केली असून, लवकरच ही सुविधा बसस्थानकावर दिसेल.-डाॅ.चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी

 

टॅग्स :state transportएसटीpassengerप्रवासी