नदीतील जलवाहिनीत रेतीचा शिरकाव
By Admin | Updated: November 2, 2014 22:29 IST2014-11-02T22:29:02+5:302014-11-02T22:29:02+5:30
२८ लाख पाण्याची तुमसर शहराला गरज असताना केवळ नऊ लक्ष पाण्याचा पुरवठा एका दिवसाआड करणे सध्या तुमसर पालिकेकडून सुरु आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माडगी

नदीतील जलवाहिनीत रेतीचा शिरकाव
तुमसर : २८ लाख पाण्याची तुमसर शहराला गरज असताना केवळ नऊ लक्ष पाण्याचा पुरवठा एका दिवसाआड करणे सध्या तुमसर पालिकेकडून सुरु आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माडगी पंपगृहाच्या इंटकवेल (जॅकवेल) जोडनलिकेत नदीपात्रातील रेतीचा शिरकाव झाल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाले आहे. येत्या एका आठवड्यात शहराला पूर्ववत पाणीपुरवठा सुरु करण्याकरिता युद्धस्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी पत्रपरिषदेत दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने सुमारे दहा ते बारा वर्षापूर्वी वैनगंगा नदी शेजारी माडगी येथे तुमसर शहराला पाणीपुरवठा करणारे पंपगृह तयार केले होते. पंपगृहापर्यंत इंटकवेल (जोडनलिका) पंपगृहापर्यंत येते या इंटकवेलमध्ये रेतीने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने पंपगृहातील सहा अम्पूलरमध्ये तांत्रीक बिघाड निर्माण झाले.
स्टँड बाय पंप पुन्हा लावला. तो केवळ चार ते पाच दिवस सुरु होता. पुन्हा रेतीचा येवा पंपात गेला. त्यामुळे पंपसुद्धा जळला. माडगी नदीपात्रात भरपूर पाणी असल्याने झोन नलिकेतील रेती काढता येत नाही. न.प. प्रशासन, नगरसेवकांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत पंप तात्काळ दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूर येथे अॅम्पूलर दुरुस्तीकरिता पाठविण्यात आले. या अॅम्पुलरमध्ये मोठा तांत्रीक बिघाड निर्माण झाल्याची माहिती तांत्रिक तज्ज्ञांनी दिली.
नगरपरिषदेचे चार कर्मचारी याकरिता सध्या नागपुरात ठाण मांडून बसले आहे. अॅम्पुरची नवीन डिझायनिंग करणे, मोल्ड करणे, कास्टींग करणे याकरिता दहा ते बारा दिवस लागणार अशी माहिती तांत्रिक कर्मचाऱ्यांनी दिली. तुमसर शहराला कोष्टी नदीघाटावरील दुसऱ्या पंपगृहातून सुमारे नऊ लक्ष लिटर पाणी शहराकरिता जमा केले जात आहे. येथे भारनियमनाचा सध्या लटका बसत आहे. त्याकरिता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क सुरु आहे. भारनियमनाची समस्या निकाली निघाली तर १३ लक्ष मिटर पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. कोष्टी येथील पंपगृहात गुजरातमधील अहमदाबाद येथून दि. ४ नोव्हेंबरपर्यंत सबमर्सीबल पंप बोलाविण्यात आले आहे. या पंपाची क्षमता एका तासात १ लक्ष २० हजार लिटर पाणी जमा करण्याची आहे. यामुळे ७० ते ८० टक्के समस्या दूर होईल.
शहरात सध्या सुमारे चार हजार नळ जोडणी आहे. यातून वार्षीक पाणी करातून केवळ ५० लक्ष जमा होतात तर या योजनेवर सुमारे १ कोटीचा खर्च येतो. दलित उत्थान योजनेतून दोन मोटार खरेदीचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीकरिता पाठविण्यात आले आहे. या योजनेला मंजुरी मिळाली तर शहराला दोन्ही वेळ पाणी देण्यास मदत होईल.
शहरात सुमारे १२ वर्षापासून दिवसातून एकदाच पाणी देण्यात येते. पत्रपरिषदेला नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरेसह उपाध्यक्ष सरोज भुरे, पाणीपुरवठा सभापती प्रशांत उके, नगरसेवक आशिष कुकडे, लक्ष्मीकांत सलामे, दिपक कठाणे तथा पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)