शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

सिलीमनाईट खाण बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:48 AM

तालुक्यातील पोहरा येथील महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाची सिलीमनाईट खाण बंद करण्याचा निर्णय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला आहे. आशिया खंडात व भारतात खनिज उत्पादनात नावलौकीक मिळविलेली खाण ४२ वर्षानंतर बंद पडणार आहे.

ठळक मुद्देराज्य खनिकर्म महामंडळाचा निर्णय : २७ कामगारांवर अन्याय

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील पोहरा येथील महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाची सिलीमनाईट खाण बंद करण्याचा निर्णय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला आहे. आशिया खंडात व भारतात खनिज उत्पादनात नावलौकीक मिळविलेली खाण ४२ वर्षानंतर बंद पडणार आहे. सध्यास्थितीत खाणीत २७ मजूर कामावर असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.लाखनीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या पोहरा गावाचा परिसर टेकड्यांनी वेढला आहे. या परिसरात १९७७ पासून महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने सिलीमनाईट खाण सुरू केली. सदर खाणीचा परिसर ३९ हेक्टरचा आहे. त्यापैकी १९ हेक्टर परिसरात प्रत्यक्ष खाण आहे. १९७७ पासून सुरु असलेल्या या खाणीत सुरुवातीला ४७५ च्यावर खाण कामगार होते. पोहरा, मेंढा, गडपेंढरी, शिवनी, चान्ना, धानला या परिसरातील अनेक गावातील लोकांना रोजगार मिळाला होता. मोठ्या प्रमाणात खनिज उत्पादन होत होते. खनिजांना बाजारात प्रचंड मागणी होती. दररोज हजारो टन खनिजाचे उत्पादन होत होते. १९९४-९५ पासून उत्पादन घटल्याने महामंडळाने कामगारांना स्वेच्छानवृत्ती सुरू केली. तेव्हापासून खाणीच्या उत्पादनात घट होत गेली.खनिकर्म महामंडळाने गेल्या १० ते १५ वर्षात पोहरा खाणीकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या या खाणीत फलायरोफाईट नावाच्या खनिजाचे उत्पादन घेतले जाते. यासाठी कौशल्याधारित, अर्धकौशल्याधारित २७ कामगार आहेत. वर्षभरात ८० ते ८५ टन खनिज बाहेर पाठविला जातो. महिन्याला ७० ते ७५ टन फलायरोफाईट खनिजाचे उत्पादन होते. पोहरा खाणीच्या खनिजाला बाजारात मागणी नाही कारण महामंडळाने निश्चित केलेला दर जास्त आहे.खासगी उत्पादनकर्त्यांकडून कमी पैश्यात उद्योजकांना माल मिळतो. त्यामुळ ेपोहरा खाणीचा माल पडून आहे. फलायरोफाईटचा वापर सिरॅमिक उद्योगात केला जातो. पोहरा माईन्समध्ये अनेक लोखंडी साहित्य, वाहने पडून आहे. २७ कामगारांमध्ये ५ चौकीदार आहे तर एक कामगार कार्यालय सांभाळतो. कार्यालय तुटलेले आहे.मौल्यवान खनिजांचा साठापोहरा खाणीत कोरंडम, तीन ग्रेडचे सिलीमनाईट, टमेलाईन फलायटाईट दोन ग्रेडचे उत्पादन घेतले जात होते. आशिया खंडात कोरंडम धातू निर्माण होणारी पोहरा ही एकमेव खाण आहे. भारतात सिलीमनाईटच्या उत्पादनात पोहरा ही खाण महत्त्वपूर्ण होती. कोरंडम व सिलीमनाईटचे उत्पादन सध्या होत नाही. परंतु कोरंडम व सिलीमनाईटमुळे खनिकर्म मंडळाला कोट्यवधीचा महसुल मिळत होता.खाण बंद करण्याचा निर्णयमहाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ पोहरा खाणीच्या २७ कामगारांना १५ मे रोजी खनिकर्म मंडळाचे जनरल मॅनेजर पी. वाय. टेंभरे नोटीस पाठवुन खाण बंद करण्याच्या सुचना दिल्या आहे. गेल्या तीन वर्षापासून खाण तोट्यात चालत असून उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न खर्च कमी असल्याने व उत्पादनाचा बजारात मागणी नसल्याचे स्पष्ट केले आहे.महामंडळाची उदासीनतामहामंडळ खाण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरी २७ लक्ष रुपये शासनाकडे जमा करुन लिज वाढविली. खाणीचे खाजगीकरण होण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या यापुर्वीच्या अध्यक्षांनी खाणीकडे कानाडोळा केला आहे. मंडळाच्या अध्यक्षांनी पोहरा माईन्सच्या प्रश्नाकडे लक्ष दिलेले नाही. ९५ एकराचा पोहरा खाणीचा परिसर आहे. खाण बंद करण्याचा निर्णय घेतल्याने एका सोनेरी युगाच्या शेवट होणार आहे.