हवाई सफरसाठी सिद्धार्थची निवड

By Admin | Updated: June 23, 2015 01:16 IST2015-06-23T01:16:29+5:302015-06-23T01:16:29+5:30

‘लोकमतच्या संस्कार मोती’ २०१४-२०१५ मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात मुंबई-दिल्ली या हवाई सफरसाठी...

Siddhartha's choice for air travel | हवाई सफरसाठी सिद्धार्थची निवड

हवाई सफरसाठी सिद्धार्थची निवड

सेंट पिटरचा विद्यार्थी : लोकमत संस्कार मोती स्पर्धा
भंडारा : ‘लोकमतच्या संस्कार मोती’ २०१४-२०१५ मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात मुंबई-दिल्ली या हवाई सफरसाठी भंडारा येथील सिध्दार्थ शैलेंद्र मैने याची निवड करण्यात आली आहे. तो भंडारा येथील सेंट पिटर शाळेचा इयत्ता आठव्या वर्गाचा विद्यार्थी आहे.
शालेय विद्यार्थ्यांचे सुप्त गुण वाढावे यासाठी लोकमत परिवाराच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असते. लोकमत संस्कार मोती २०१४-१५ मध्ये शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
ही स्पर्धा १ जुलै ते ११ आॅक्टोंबर या १०० दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्हयातील अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.
यात सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना लोकमत परिवारातर्फे बक्षीस व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याच स्पर्धेत जिल्हानिहाय एका विद्यार्थी स्पर्धकाची ‘मुंबई-दिल्ली-मुंबई’ हवाई सफरसाठी निवड करण्यात येणार होती.
त्या अंतर्गत हवाई सफरसाठी भंडारा येथील सेंटपिटर स्कूल विद्यार्थी सिध्दार्थ मैने याची निवड करण्यात आली आहे. ही हवाई सफर एक दिवसाची असून ती २५ जूनला होणार आहे. या हवाई सफरसाठी सिध्दार्थला नागपूर येथून दिल्ली व परत नागपूरपर्यंत असा होणारा प्रवासाचा खर्च लोकमत परिवार उचलणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Siddhartha's choice for air travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.