सिंदपुरीत कासवगतीने शेडची उभारणी
By Admin | Updated: September 4, 2014 23:34 IST2014-09-04T23:34:55+5:302014-09-04T23:34:55+5:30
सिंदपुरी गावात आपादग्रस्तांच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी टिनाचे शेड उभारण्यात येत आहेत. या शेड उभारण्याच्या कामाला कासवगती आहे. समाज मंदिरात आपादग्रस्तांनी पोळा सण साजरा केला असताना दिवाळीही

सिंदपुरीत कासवगतीने शेडची उभारणी
रंजित चिंचखेडे - चुल्हाड
सिंदपुरी गावात आपादग्रस्तांच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी टिनाचे शेड उभारण्यात येत आहेत. या शेड उभारण्याच्या कामाला कासवगती आहे. समाज मंदिरात आपादग्रस्तांनी पोळा सण साजरा केला असताना दिवाळीही यात जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सिंदपुरी गावात अतिवृष्टीच्या पाण्याने तलावाची पाळ फुटली. विसर्ग होणारे पाणी गावात शिरले. १७३ कुटुंबाचे संसार प्रभावित झाले. तर अनेकांचे घर कोसळले.आपादग्रस्त नागरिकांना गावातील शाळा व समाज मंदिरात आश्रय देण्यात आलेला आहे. या घटनेला महिनाभराचा कालावधी पूर्ण होत आहे. परंतु ठोस मदत गावकऱ्यांना मिळाली नाही. सुरुवातीपासून गावकऱ्यांचे संकट शासनाने गांभीर्याने घेतले नाही. सामाजिक संस्थांच्या मदतीने आपादग्रस्तांना सावरण्याचा प्रयत्न होत आहे.
माळीणच्या भूस्खलनात संपूर्ण सरकार मदतीला धावून गेली आहे. परंतु सिंदपुरीच्या आपादग्रस्तांना साधे सांत्वना देण्याचे टाळण्यात आले आहे. गावातील आपादग्रस्तांना मदत तथा शासकीय अनुदान वाटपाची जबाबदारी महसूल विभागाला देण्यात आलेली आहे. पावसाळा सुरु असताना अतिवृष्टीग्रस्तांना सानुग्रह मदत वाटपासाठी तालुक्याला अंदाजे ३ लक्ष रुपये देण्यात आले आहे. ही राशी महसूल विभागाने सिंदपुरीच्या आपादग्रस्तांना मदत वाटपात खर्च केली आहे.
या नागरिकांना खावटी तथा अन्य मदतीसाठी देण्यात आलेली आहे. परंतु या उलट महसूल विभागालाच धारेवर धरले जात आहे. तालुका म हसूल विभागाला शासन मदत वाटपासाठी निधी देत नाही. निधी खेचून आणण्यासाठी जिल्हा प्रशासन तथा लोकप्रतिनिधी गंभीर नाहीत. यात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा दोष नाही. गावकऱ्यांना न्याय देण्यासाठी निधीची प्रतीक्षा या कर्मचाऱ्यांना आहे.
पाण्याने बाधीत घरे तथा शेतीचे सर्व्हेक्षण शासकीय अनुदान वाटपाची जबाबदारी महसूल विभागाला देण्यात आलेली आहे. पावसाळा सुरु असताना अतिवृष्टीग्रस्तांना सानुग्रह मदत वाटपासाठी तालुक्याला अंदाजे ३ लक्ष रुपये देण्यात आले आहे. ही राशी महसूल विभागाने सिंदपुरीच्या आपादग्रस्तांना मदत वाटपात खर्च केली आहे. या नागरिकांना खावटी तथा अन्य मदतीसाठी देण्यात आलेली आहे. परंतु याउलट महसूल विभागालाच धारेवर घेतले जात आहे. तालुका महसूल विभागाला शासन मदत वाटपासाठी निधी देत नाही. निधी खेचून आणण्यासाठी जिल्हा प्रशासन तथा लोकप्रतिनिधी गंभीर नाहीत. यात महसूल विभागातील कर्मचाऱ् यांचा दोष नाही. गावकऱ्यांना न्याय देण्यासाठी निधीची प्रतिक्षा या कर्मचाऱ्यांना आहे. पाण्याने बाधीत घरे तथा शेतीचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. अंतिम याद्या तयार आहेत. तालुका प्रशासनाने या याद्या जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. गावात या आपादग्रस्तांना निवारा देण्यासाठी २५ टिनाचे शेड उभारण्यात येत आहेत. अती गरजू आपादग्रस्तांना टिनाचे शेड वाटप करण्यात येणार आहेत. या शेडमध्ये कुटुंबियांची गैरसोय होणार आहे. टिनाचे शेड उभारणीच्या कामाला कासवगती आहे. आजघडीला फक्त ६ टिनाचे शेड तयार झाली आहेत. उर्वरीत शेड उभारणीचा थांगपत्ता नाही.
टिनाचे शेड निर्मितीसाठी साहित्याचा पुरवठा संस्थाकडून होत आहे. सामाजिक बांधीलकी जोपासत असल्याचा उदोउदो करण्यात येत आहे. या कामावर महसूल विभागाचे नियंत्रण आहे. परंतु साहित्याचा पुरवठा निकृष्ट होत असल्याचे नियंत्रण ठेवणारे कर्मचारी हैराण झाली आहेत. टिनाच्या पत्र्यांना छिद्र आहेत. अनेक पत्र्यांना गंज लागलेला आहे. हे टिनाचे पत्रे कधी कोसळतील याचा नेम नाही. गावकऱ्यांना जलद गतीने मदत वाटपात जिल्हा प्रशासनाकडून उदासीनता दिसून आली आहे.