आजारी मायलेकींचे चंद्रमोळीत वास्तव्य

By Admin | Updated: December 18, 2014 00:34 IST2014-12-18T00:34:49+5:302014-12-18T00:34:49+5:30

मानवाच्या तीन गरजांपैकी निवारा ही एक अत्यंत महत्वपूर्ण गरज आहे. एका आजारी मायलेकींना नाईलाजाने निवाऱ्याअभावी चंद्रमोळीत थंडीत कुडकुडत जीवन जगावे लागत आहे.

Sick myelikes live in the moonlight | आजारी मायलेकींचे चंद्रमोळीत वास्तव्य

आजारी मायलेकींचे चंद्रमोळीत वास्तव्य

मोहन भोयर तुमसर
मानवाच्या तीन गरजांपैकी निवारा ही एक अत्यंत महत्वपूर्ण गरज आहे. एका आजारी मायलेकींना नाईलाजाने निवाऱ्याअभावी चंद्रमोळीत थंडीत कुडकुडत जीवन जगावे लागत आहे. गोबरवाही डोंगरी बु. या जगप्रसिद्ध मॅग्नीज खाणीकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारीच या मायलेकींचे सध्या वास्तव्य आहे. श्रीमंतीच्या वाटेवर चंद्रमोळीत वास्तव्याला असणाऱ्या मायलेकींकडे कुणाचेच लक्ष नाही. धकाधकीच्या आधुनिक जगात कुणाकडे वेळ व सहाय्य नाही असे दिसून येते.
गोबरवाही डोंगरी बु. रस्त्याशेजारी हिगबाई सजदलाल उईके (६५) व तिची मुलगी दशमी उईके (२०) एका गवत व लाकडाच्या चंद्रमोळीत मागील पाच वर्षापासून वास्तव्याला आहेत. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचे गोबरवाही येथील घर पडले. त्यानंतर हिगबाई आपली मुलगी दशमी सोबत चंद्रमोळीत वास्तव्याला आली. हिगबाईचे नाव दारिद्र्य रेषेखाली यादीत नाही. त्यांच्याकडे शेती नाही. उपजिवीकेकरिता हिगबाई मोलमजुरी करीत आहे. आजारी दशमीला सोडून जाता येत नाही. म्हणून या हंगामात चंद्रमोळीजवळील नहराखाली मोकळ्या जागेत धानाचे पीक घेतले. दोन ते तीन पोती धानाचे पीक या हंगामात आले. त्याची भरडाई करण्याकरिता पैसा नाही. काय करावे या विवंचनेत त्या सध्या आहेत.
हिगबाईची चंद्रमोळी जमिनीशी समतल आहे. मागे पाणी आहे. गवत व इतर कचरा असल्याने सरपटणाऱ्या प्राण्याचा येथे सदैव भीती आहे. मुलगी दशमीला न कळणारा आजार आहे. नाकातून व डोळ्यातून सतत पाणी पसरत असतो. एकदा नागपूर येथे रुग्णालयात उपचाराकरिता नेले होते. पुन्हा तो आजार बळावला आहे. इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण दशमीने घेतले आहे. हिगबाई रात्री आपल्या चंद्रमोळीत एकटीच राहते. मुलगी दशमीला सुरक्षितेकरिता शेजारच्या घरी रात्री पाठविते. आजार बरा कसा होईल ही चिंता हिगबाईला सतावत आहे.गोबरवाही डोंगरी बु. मार्ग श्रीमंतीचा मार्ग आहे. या मार्गावर जयप्रसिद्ध मॅग्नीजच्या खाणी आहेत. मोठे अधिकारी, कंत्राटदार तथा कर्मचारी याच मार्गावरून मार्गक्रमण करतात. परंतु एकाही सहृदय माणसांचे लक्ष या चंद्रमोळीकडे गेले नाही. खनिज विकास निधीतून कोट्यवधींचा निधी मॉईल प्रशासन दरवर्षी देण्याचा दावा करते. चंद्रमोळीत वास्तव्य करणाऱ्या मायलेकींना एक निवारा बांधून देण्याची गरज आहे.गोबरवाही ग्रामपंचायतीचेही येथे दुर्लक्ष असून बीपीएल यादीत नाव समाविष्ट करणे व निवारा बांधून देण्याची गरज आहे.

Web Title: Sick myelikes live in the moonlight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.