श्वेता साठवणे जिल्ह्यात अव्वल
By Admin | Updated: June 9, 2015 00:47 IST2015-06-09T00:47:10+5:302015-06-09T00:47:10+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल सोमवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित ..

श्वेता साठवणे जिल्ह्यात अव्वल
निकालात मुलींनी मारली बाजी, लाखनी तालुका आघाडीवर मोहाडी तालुका पिछाडीवर
भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल सोमवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. जिल्ह्याचा निकाल ८२.७२ टक्के लागला असून नागपूर विभागात हा निकाल शेवटच्या स्थानावर आहे. बारावीचा निकालात अव्वलस्थानी असताना दहावीचा निकाल माघारल्यामुळे शिक्षण विभागावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची श्वेता अरविंद साठवणे ही विद्यार्थिनी जिल्ह्यातून पहिली आली आहे. तिला ९६.६० टक्के गुण मिळाले आहेत. लाखनी येथील समर्थ विद्यालयाची त्रिवेणी बिसेन ही द्वितीय ९५.८० टक्के, समर्थ विद्यालयाचा धीरज बोपचे ९५.४० टक्के, भंडारा येथील महिला समाज विद्यालयाचा निखिल गोटेफोडे याला ९५.४० टक्के गुण मिळाले आहेत.
निकालात मुलींची सरशी
यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. यात १०,२२६ मुले आणि १०,२८३ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यात ८,१२९ मुले तर ८,८३७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची टक्केवारी ८५.९४ तर मुलांची टक्केवारी ७९.४९ इतकी असून त्यात मुली ६.४५ टक्क्यांनी समोर आहेत.
लाखनी तालुका अव्वलस्थानी
लाखनी तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८८.८८ टक्के इतका आहे. या तालुक्यात २५ शाळेतून १,७५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ८०९ मुले व ७४९ मुली असे एकूण १,५५८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
साकोली तालुक्याचा निकाल ८४.४९ टक्के आहे. ४२ शाळेतून २,८०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १,१८० मुले तर १,१८९ मुली असे एकूण २,३६९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लाखांदूर तालुक्याचा निकाल ७९.८८ टक्के आहे. ३६ शाळेतून २,१५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ७७१ मुले तर ९४८ मुली असे एकूण १,७१९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
भंडारा तालुक्याचा निकाल ८४.७६ टक्के आहे. ५७ शाळेतून ४,४५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १,९८७ मुले तर २,०४५ मुली असे एकूण ४,०३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पवनी तालुक्याचा निकाल ८३.३३ टक्के आहे. ४० शाळेतून २,७३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १,०६० मुले तर १,२२० मुली असे एकूण २,२८० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तुमसर तालुक्याचा निकाल ७९.७७ टक्के आहे. ५३ शाळेतून ३,६९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १,४०३ मुले तर १,५४३ मुली असे एकूण २,९४६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मोहाडी तालुक्याचा निकाल ७८.८८ टक्के आहे. ३३ शाळेतून २,६१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ९१९ मुले तर १,१४३ मुली असे एकूण २,०६२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.