बँकेच्या संपांचा ग्राहकांना फटका

By Admin | Updated: November 12, 2014 22:38 IST2014-11-12T22:38:01+5:302014-11-12T22:38:01+5:30

वेतनवाढ, पेंशन, बँकांचे विलीनीकरण, आऊटसोर्सींग यासह अनेक प्रलंबित मुद्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी आज बुधवारी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला.

Shutting customers of bank's assets | बँकेच्या संपांचा ग्राहकांना फटका

बँकेच्या संपांचा ग्राहकांना फटका

भंडारा : वेतनवाढ, पेंशन, बँकांचे विलीनीकरण, आऊटसोर्सींग यासह अनेक प्रलंबित मुद्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी आज बुधवारी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला. या संपामध्ये जिल्ह्यातील ५४ राष्ट्रीयकृत बँकांनी सहभाग घेतला. त्यामुळे व्यवहार पूर्णत: ठप्प पडले होते. याचा ग्राहकांमध्ये संताप दिसून आला.
जिल्ह्यात लाखोंच्या घरात बँकेचे खातेधारक आहेत. त्यातील अनेकांचे व्यवहार बँकेवर अवलंबून आहेत. यात शेतकरी, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, पेंशनधारक, शासकीय योजनेचे मानधनधारक यांचा समावेश अधिक आहे. बँकांच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल होत असते. मात्र आज पुकारलेल्या संपामुळे बँकेचे व्यवहार ठप्प पडल्याचे दिसून येत होते. आज सकाळपासून संपाची कल्पना नसलेल्या अनेक खातेधारकांनी बँकेकडे धाव घेतली होती. मात्र बँका बंद दिसून आल्याने त्यांचा हिरमोड झाला. सदर प्रतिनिधीने शहरात फेरफटका मारला असता शहरातील राष्ट्रीयकृत बँका बंद दिसून आल्या. बँकेच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी संपावर असल्यामुळे बँका बंद आहेत. असा फलक लावलेला होता. जिल्ह्यातील सातही तालुक्यात संपाचा फटका बसल्याचे ग्राहकांमध्ये दिसून आले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Shutting customers of bank's assets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.