गणेशपूर वसाहतीतील रस्त्यांना झुडुपांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:36 IST2021-07-30T04:36:48+5:302021-07-30T04:36:48+5:30

भंडारा : शहरालगत असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या अनेक रस्त्यांना आता झुडुपांचा वेढा पडला आहे. रस्ते अरुंद झाल्याने वाहन चालविणे ...

Shrubs surround the roads in Ganeshpur colony | गणेशपूर वसाहतीतील रस्त्यांना झुडुपांचा वेढा

गणेशपूर वसाहतीतील रस्त्यांना झुडुपांचा वेढा

भंडारा : शहरालगत असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या अनेक रस्त्यांना आता झुडुपांचा वेढा पडला आहे. रस्ते अरुंद झाल्याने वाहन चालविणे कठीण जात असून झुडुपांमुळे सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांची भीतीही निर्माण झाली आहे. राजेंद्र वाॅर्डातील गुरुकुंज काॅलनीत तर रस्ता आहे की झुडुप अशी अवस्था झाली आहे.

भंडारा शहरालगत गणेशपूर ग्रामपंचायत आहे. मोठी ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक आहे. परंतु अंतर्गत रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुकुंज काॅलनीतील जाजू यांच्या घरापासून थोटे यांच्या घरापर्यंत सीमेंट रस्ता आहे. परंतु या रस्त्याच्या बाजूला मोठाली झुडुपे वाढली आहेत. गुजराती काॅलनीतील नागरिकांना याच रस्त्यावरून जावे लागते. रात्री-अपरात्री जाताना मनामध्ये भीती असते. या रस्त्यावरून चारचाकी वाहन जाणेही कठीण झाले आहे. याबाबत या परिसरातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु पावसाळ्यापूर्वी या झुडुपांची कटाई करण्यात आली नाही. यासोबतच इतर समस्याही कायम आहेत.

Web Title: Shrubs surround the roads in Ganeshpur colony