धान खरेदीचा श्रीगणेशा
By Admin | Updated: June 3, 2016 00:37 IST2016-06-03T00:37:06+5:302016-06-03T00:37:06+5:30
मान्सून ७ जूनला दाखल होत असल्याच्या भाकीताला नजरेसमोर ठेवून बळीराजा धान बियाणाच्या चौकशीला लागला असून

धान खरेदीचा श्रीगणेशा
कृषी केंद्र बियाण्यांनी फुल्ल : बोगस बियाणे विक्री विरोधात पथक
पालांदूर : मान्सून ७ जूनला दाखल होत असल्याच्या भाकीताला नजरेसमोर ठेवून बळीराजा धान बियाणाच्या चौकशीला लागला असून जमिनीचा पोत व पाण्याची क्षमता पाहून बियाण्यांची चाचपणी करीत आहे. अपेक्षित बियाने मिळताच खरेदीचा शुभारंभ सुरू झालेला आहे.
अवकाळी पावसाने तीन चार वेळा हजेरी लावल्याने जमिन नांगरायला मदत झाली. मृग नक्षत्राच्या आरंभी मान्सून डेरेदाखल होत असल्याने बियाणांची चिंता वाढली आहे. बळीराजा चर्चा करीत असून बोगस कंपन्याचे व महागडे बियाणे खरेदी न करण्याचा बेत आखत आहेत. धान बियाणे कंपन्या बेसुमार भाव वाढवून प्रत्यक्ष शेतकऱ्याची लुट करतात. कृषि केंद्रधारकांना अधिक विक्रीचे आमिष देवून देश विदेश वारी करून आणतात काही अधिकारी कंपन्याशी मिलीभगत करून बोगस छुपा पाठिंबा देतात.
शेतकऱ्यांकरीता व अन्य प्रकल्पग्रस्ताकरीता आम्ही सदैव तत्पर आहोत. काम नियमात करून बिले पक्की घ्या, थैली फेडून विक्रीकरू नका व ग्राहकांनी फोडलेली थैली खरेदी करू नका. खरेदी करतेवेळी समस्यांचे निराकरण कृषि केंद्र धारकांकडून लगेच करून घ्या. आदी माहिती अगदी परखडपणे दिली. यामुळे अख्या तालुका सावध झाला असून पूर्ण दस्ताऐवज असतील तरच कृषी केंद्रधारक बियाने दुकानात ठेवतो आहे. पालांदूर येथील मान्यताप्राप्त कृषी केंद्रात ३०-३५ जातीचे धानाचे बियाणे विक्रीकरीता उपलब्ध झाली आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या कंपन्यांचे सुद्धा बियाणे अनुदानावर व माफक दरात चांगल्या जातीचे उपलब्ध झाली आहेत. (वार्ताहर)