श्रावणाची हिरवळ दाटली मंचावर
By Admin | Updated: August 26, 2014 23:15 IST2014-08-26T23:15:41+5:302014-08-26T23:15:41+5:30
लोकमत सखी मंच तर्फे श्रावण सोहळ्यानिमित्त नृत्य स्पर्धा, ग्रीन मॅचिंग स्पर्धा व वॉर्डनिहाय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रीन मॅचिंग स्पर्धेमध्ये सखींनी अशी वेशभूषा केली

श्रावणाची हिरवळ दाटली मंचावर
सखी मंचचा उपक्रम : विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप
भंडारा : लोकमत सखी मंच तर्फे श्रावण सोहळ्यानिमित्त नृत्य स्पर्धा, ग्रीन मॅचिंग स्पर्धा व वॉर्डनिहाय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रीन मॅचिंग स्पर्धेमध्ये सखींनी अशी वेशभूषा केली की श्रावणाची हिरवळ दाटली. सखी मंचावर असा भासच झाला. स्पर्धेतून विजयी स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता संध्या किरोलीकर, पाहुणे कायाकल्प लेडीज फिटनेस झोनच्या संचालिका मिताली भागवत, राधा कलेक्शनच्या संचालिका मधुरा हलदुलकर व परीक्षक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. ग्रीन मॅचिंग स्पर्धेत दोन फेऱ्यांमधून एकूण २५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्रथम फेरीत स्पर्धकांचे परिचय, रंग वापर व हिरव्या रंगातील परिधान दागिने सज्जा, केशभूषा व रंगभूषा करून मंचावर जणू श्रावणाची हिरवळच अवतरली असे वाटत होते. यात प्रथम क्रमांकाकरिता मंगला डहाके, द्वितीय सोनू साखरकर, तृतीय क्रमांकाकरिता सुनिता हुकरे यांना निवडण्यात आले. राधाकृष्ण नृत्य स्पर्धेत युगल प्रकारात हर्षा रक्षिये व मनिषा रक्षिये यांनी नवरंग चित्रपटातील अरे जारे हट नटखट ना खोल मेरा घुंगट या गीतावर अप्रतीम नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले. तर एक नृत्यामध्ये रुपाली पराते प्रथम तर द्वितीय क्रमांक प्रियदर्शनी चंद्रिकापुरे यांनी प्राप्त केला. कार्यक्रमादरम्यान वॉर्डनिहाय स्पर्धेतील बक्षिस वितरण करण्यात आले. गणेशपूर येथे राखी थाली सजावट स्पर्धेत प्रथम पूजा रक्षिये, द्वितीय शालीनी धोंडे, काझीनगर येथे प्रथम अनिता टोपरे व सुनिता हुकरे, द्वितीय, सहकार नगर येथे रांगोळी स्पर्धेत प्रथम अनिता निमजे व द्वितीय रजनी धकाते, चांदणी चौक परिसरातून राखी मेकींग स्पर्धेत जुली निमजे प्रथम तर द्वितीय शिल्पा न्यायखोर व राजीव गांधी चौक एम.एस.ई.बी. कॉलनीत प्रथम विशाखा जिभकाटे तर द्वितीय चित्रा झुरमुरे यांनी मिळविला. श्रावण मेळावा स्पर्धेचे परिक्षण लाखनी तालुका संयोजिका शिवानी काटकर, पवनी येथील अल्का भागवत तर साकोली येथील सुचिता आगाशे यांनी केले. पाहुण्यांना व परिक्षकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार, संचालन शरयू टाकळकर तर आभार सुहासीनी अल्लडवार यांनी मानले. जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे व युवा नेक्स्ट संयोजिका ग्रिष्मा खोत यांनी सदस्य नोंदणीची माहिती दिली. वॉर्ड संयोजिका सुधा बत्रा, कल्पना डोंगरे, सोनाली तिडके, शिलपा न्यायखोर, राखी सूर, सारिका मोरे, हर्षा बावनकर, लतीशा खोत, स्नेहा वरकडे व सुधाकर गोन्नाडे व तिघरे यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)