ओबीसींच्या हक्कासाठी महामोर्चात एकता दाखवा

By Admin | Updated: October 11, 2016 00:31 IST2016-10-11T00:31:21+5:302016-10-11T00:31:21+5:30

देशातील ५२ टक्के ओबीसींना संविधानाने कलम ३४० अंतर्गत दिलेल्या अधिकारासाठी ओबीसी बांधवांनी संघटित होऊन...

Show solidarity in the upper house for OBC claim | ओबीसींच्या हक्कासाठी महामोर्चात एकता दाखवा

ओबीसींच्या हक्कासाठी महामोर्चात एकता दाखवा

बबन तायवाडे : ओबीसी महासंघ व संघर्ष कृती समितीची बैठक
भंडारा : देशातील ५२ टक्के ओबीसींना संविधानाने कलम ३४० अंतर्गत दिलेल्या अधिकारासाठी ओबीसी बांधवांनी संघटित होऊन ८ डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनावरील ओबीसी महामोर्चात सहभागी होऊन शक्ती व एकता दाखवावी, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी संघर्ष कृती समितीच्या सयुंक्त बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, माजी आमदार सेवक वाघाये, अ‍ॅड.आनंदराव वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे, संघटक जीवन लंजे, शरद वानखेडे, विजय तपाडकर, गुणेश्वर आरीकर, ओबीसी संघर्ष कृती समिती संयोजक खेमेंद्र कटरे, भैय्याजी लांबट, प्रा. शेषराव येलेकर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य तायवाडे म्हणाले, ६० टक्के ओबीसी समाजाला मराठा समाजापासून बोध घेण्याचे आवाहन केले. १५ टक्के एससी, ७.५ टक्के एस.टी. आणि ४ टक्के अल्पसंख्यकांसाठी स्वतंत्र मंत्रालय आहे. परंतु ६० टक्के ओबीसी समाजाला घटनेने दिलेल्या ३४० व्या कलमानुसार अधिकार दिले असूनही स्वतंत्र मंत्रालयही नाही. ओबीसी समाजातील नेत्यांनी ३४० कलमाचा अभ्यास केला असता तर आज ही वेळ आली नसती असे मत व्यक्त केले.
यावेळी माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांनी ओबीसींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले. डॉ.बाबासाहेबांनी ओबीसींसाठी आवाज उठविला होता. महामोर्चात धानाला हमी भाव मिळाला पाहिजे. ही मागणी रेटून धरण्याचे आवाहन केले. माजी आमदार सेवक वाघाये म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष समितीचा लाखनीत मेळावा घेण्याची घोषणा केली. जीवन लंजे म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्यात ओबीसी चळवळीला बळकट करण्यासाठी आणि सर्व राजकीय नेते, पदाधिकारी यांना एकत्रित करण्यासाठी पक्षीय मतभेद बाजुला सारून गावपातळीवरील सरपंचासह सर्वच आजी माजी लोकप्रतिनिधींना सोबत घेण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ.खान यांनी आम्ही मुस्लीम असलो तरी ओबीसी आहोत आणि मूळ भारतीय आहोत. यावेळी भय्याजी लांबट, प्रा.रमेश पिसे, प्रा.शेषराव येलेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक खेमेंद्र कटरे यांनी केले. संचालन गोपाल सेलोकर यांनी केले. आभार संजय आदमने यांनी मानले. बैठकीला मंगेश वंजारी, मनोज चव्हाण, महेंद्र निबांर्ते, अमित गायधने, विजय पारधी, काशिनाथ ढोमणे उमेश ठाकरे, गौरव आकरे, शिवा मुनघाटे, नितीन साकुरे, अमित गायधने, डॉ.श्रीकांत भुसारी, प्रकाश रहागंडाले, उमेश मोहतुरे, संजय निखाडे, बाबा पाटेकर, दामोदर क्षीरसागर, डॉ.अजय तुमसरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Show solidarity in the upper house for OBC claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.