शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

गल्लीबोळात शिकवणी वर्गांची "दुकानदारी"

By admin | Published: May 27, 2017 12:26 AM

शहरासह तालुक्यातील गल्लीबोळात शिकवणी वर्गाचे पेव फुटले आहे. गुणवंतांच्या टक्केवारीचे भांडवल करीत शिकवणी संचालक आपले खिसे भरीत आहेत.

आर्थिक पिळवणूक : गुणवंतांच्या टक्केवारीचे भांडवललोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरासह तालुक्यातील गल्लीबोळात शिकवणी वर्गाचे पेव फुटले आहे. गुणवंतांच्या टक्केवारीचे भांडवल करीत शिकवणी संचालक आपले खिसे भरीत आहेत. लाखो रुपये कमावणाऱ्या या शिकवणी वर्गांकडे कुणाचेही लक्ष नसते. सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या जागेत विद्यार्थी शिकताना दिसतात.स्पर्धेच्या युगात टक्केवारीला महत्व आले आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला पैकीच्या पैकी गुण हवे असतात. त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. याच मानसिकतेचा फायदा शिकवणी वर्ग चालकांनी घेतला आहे. उमरखेड शहरातील गल्लीबोळात शिकवणीवर्ग सुरू झालेले आहेत. दहावी, बारावी आणि उच्च शिक्षणाच्या शिकवणीचे ठिक आहे परंतु शहरात नर्सरीपासूनच शिकवणी घेतली जात आहे.आपल्याकडे विद्यार्थी ओढण्यासाठी शिकवणी वर्ग चालकांमध्ये जाहिरातीचे युद्ध सुरू असते. लवकरच दहावीचा निकाल लागणार आहे. या निकालात गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो काढून त्यांचे फ्लेक्स शहरात लावले जातात. त्यावर विद्यार्थ्यांच्या फोटोसह शिक्षकांचाही फोटो असतो. आमच्या शिकवणी वर्गात गुणवंत विद्यार्थी कसे घडतात, याचे गुणगाण या जाहिरात फलकात दिसून येते. मात्र त्याच शिकवणीवगार्तील नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी मात्र शिकवणी संचालक झटकतात. आमचे विद्यार्थी असले तरी त्यांनी अभ्यास केला नसेल असे सांगतात. गुणवंतांचे श्रेय घ्यायचे आणि नापासांना दूर करायचे असा हा प्रकार आहे. शहरात असलेल्या शिकवणी वर्गात विद्यार्थी नियमित येतात तर दुसरीकडे सर्व सुविधा असलेल्या महाविद्यालयाला मात्र बुट्टी मारतात. पालकही शाळा बुडली तरी चालेले शिकवणी बुडवू नको असे सांगतात.शिकवणी वर्गात सुविधांचा अभावशहरातील शिकवणी वर्गात सुविधांचा अभाव आहे. एखाद्या कोंदट खोलीत बाकडे टाकून शिकवणीवर्ग भरविले जातात. एका-एका बाकड्यावर चार-चार विद्यार्थी बसलेले असतात. शाळेत नसेल एवढी गर्दी या वर्गात असते. अनेकदा तर शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकाचा आवाजही जात नाही. आता तर शिकवणी चालकांनी पॅकेजेस सुरू केले आहेत. विविध विषयांचे पॅकेज घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना गुणवंत करायचे, असा प्रकार सुरू असतो. विशेष म्हणजे लाखो रुपये कमावणाऱ्या या शिकवणी चालकांकडे आयकर विभागाचे लक्ष नसते.