शॉट सर्किटमुळे दुकानाला आग
By Admin | Updated: June 22, 2015 00:23 IST2015-06-22T00:23:06+5:302015-06-22T00:23:06+5:30
मध्यरात्री झोपेत असताना मीटरमध्ये शॉट सर्किट होऊन आग लागल्याने किराणा दुकानातील सर्व सामान जळून ५ लक्ष...

शॉट सर्किटमुळे दुकानाला आग
तुमसर : मध्यरात्री झोपेत असताना मीटरमध्ये शॉट सर्किट होऊन आग लागल्याने किराणा दुकानातील सर्व सामान जळून ५ लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याची घटना १.१५ वाजता दरम्यान घडली.
निकेश चंद्रशेखर पशिने (४०) वर्ष यांच्या किराणा दुकान त्यांच्या मालकीच्याच घरात होता. निकेश हा दुकान बंद करुन लगतच्या घरात आपल्या परिवारासह पत्नी व मुलीसह गाळ झोपेत असताना रात्री १ वाजता दरम्यान आवाज येत असल्याने घराशेजारील मेश्राम खिडकीतून डोकावून पाहिले असता आग लागल्याचे दिसले. त्यावरुन आरडा-ओरड करत त्याची पत्नी राखी व मुलगी योगीता हिला बाहेर काढले. तोपर्यंत दुकान पूर्णत: जळून पाच लक्ष रुपयांचे नुकसान झाले. (शहर प्रतिनिधी)