शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
2
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
3
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
4
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
5
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
6
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
7
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
8
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
9
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
10
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
11
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
12
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
13
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
14
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
15
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
16
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
17
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
18
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
19
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
20
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये खेळाडूंचे प्रमाणपत्रे विकल्याचे धक्कादायक आरोप ! क्रीडा क्षेत्रात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 19:11 IST

Bhandara : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धामध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. ७२ वी स्पर्धा बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथे झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धामध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. ७२ वी स्पर्धा बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथे झाली होती. त्यामध्ये विजेते ठरलेल्या तीन खेळाडूंना प्रमाणपत्रे न देता परस्पर विकली गेली. नंतर त्यांची समजूत घालून तुमसर (जि. भंडारा) येथे झालेल्या ७३ व्या स्पर्धेत भंडारा जिल्हा संघाकडून त्यांना खेळवून गैरप्रकार करण्यात आला, अशी गंभीर तक्रार यवतमाळ जिल्ह्यातील हरजिंदर सिंग हरबन सिंग सौखी यांनी भंडारा जिल्हाधिकारी तसेच तुमसर पोलिसांत नोंदविली आहे.

अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ व भंडारा जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तुमसर येथे ७३ वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा (आमदार चषक) झाली होती. यात संघ निवड प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आणि काही खेळाडूंकडून पैसा घेऊन संघात निवड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, स्पर्धेपूर्वी झालेल्या निवड चाचणीनंतरही भंडारा जिल्ह्याचा अधिकृत संघ जाहीर करण्यात आला नाही. शेवटच्या क्षणी काही निवडक खेळाडूंना गुप्तपणे मैदानात उतरवून सामने खेळविण्यात आले. स्कोरशीटवर खेळाडूंची नावे लिहिली गेली नाहीत आणि सर्व सामने अप्रकाशित स्वरूपात खेळवले गेले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तुमसर पोलिसांनी या तक्रारीची नोंद केली असून अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. सहायक पोलिस निरीक्षक किशोर घोडेस्वार यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे.

या पदाधिकाऱ्यांवर झाले थेट आरोप

या प्रकरणात असोसिएशनचे जितेंद्रसिंग ठाकूर, सतीश डफले, प्रदीप शेलोकर, तसेच भंडारा जिल्ह्याचे सचिव विनायक वाघ आणि गोंदियाचे सचिव एस. ए. वहाब यांच्यावर थेट आरोप करण्यात आले आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून पूर्वीपासूनही कबड्डी प्रमाणपत्र विक्री व भ्रष्टाचाराचे प्रकार झाले असल्याचा आरोप हरजिंदर सिंग हरबन सिंग सौखी यांनी केला आहे. या प्रकरणी आता कारवाईकडे लक्ष लागले आहे. 

तीन खेळाडूंना प्रमाणपत्र न देता फसविले

बल्लारपूर (चंद्रपूर) येथे पार पडलेल्या ७२ व्या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे खेळाडू शुभम मेंढे, गौरव राऊत आणि विजय मरस्कुले यांना तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. ते प्रमाणपत्र पुढे इतर खेळाडूंना विकल्याचा आरोप तक्रारीत असून संबंधितांना धमकावून शांत राहण्यास भाग पाडले गेले असल्याचे हरजिंदर सिंग हरबन सिंग सौखी यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kabaddi Tournament Scandal: Players' Certificates Allegedly Sold, Creating Uproar

Web Summary : A major scandal has erupted concerning the alleged sale of certificates in state-level Kabaddi tournaments. Complaints filed accuse officials of corruption, including selling certificates and manipulating team selections. Police are investigating these serious allegations of fraud and misconduct within the sport.
टॅग्स :Kabaddiकबड्डी