शिवसेनेच्या पदयात्रेला प्रारंभ

By Admin | Updated: October 15, 2016 00:30 IST2016-10-15T00:30:09+5:302016-10-15T00:30:09+5:30

विविध मागण्यांना घेऊन शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात पवनी ते भंडारा या संघर्ष पदयात्रेला सुरूवात झालेली आहे.

Shivsena's yatra begins | शिवसेनेच्या पदयात्रेला प्रारंभ

शिवसेनेच्या पदयात्रेला प्रारंभ

पवनीतून सुरूवात : शनिवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भंडारा : विविध मागण्यांना घेऊन शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात पवनी ते भंडारा या संघर्ष पदयात्रेला सुरूवात झालेली आहे. कोंढा, अड्याळ येथून ही यात्रा पहेला येथे पोहचली. उद्या शनिवारला पहेला भंडारा येथील त्रिमुर्ती चौकात ही यात्रा पोहोचणार आहे.
शेतकऱ्यांच्या धानाला ३,५०० प्रती क्विंटल भाव द्या, बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त ३ एप्रिल रोजी स्थानिक सुटी जाहिर करावी, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवाव्या, ओबीसी मुलांना शिष्यवृत्ती मिळावी असा अनेक समस्यांचे निवेदन शासनाला जिल्हाधिकारीमार्फत देण्यात येणार आहे.
शिवसेनेच्या संघर्ष पदयात्रेत माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह उपजिल्हा प्रमुख संजय रेहपाडे, अनिल गायधने मुकेश थोटे, नरेश बावणकर, प्रभाकर वैरागडे, उपाध्यक्ष परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर, नामदेव कावळे, दामोदर जिभकाटे, योगेश तुरस्कर, डहारे गुरुजी, इस्तारी केवट, गोपीचंद भरागे, महेंद्रसींग गुरवेळ गुरुजी, बालकदास ठवकर, विजय काटेखाये, राजेंद्र ब्राम्हणकर, बाळू फुलबांधे, जितेश ईखार व शेतकरी शिवसैनिक व पदाधिकारी परमात्मा एक सेवक पदयात्रेत सहभागी झाले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Shivsena's yatra begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.