प्रस्तावित जागेवरच शिवस्मारक उभारणार
By Admin | Updated: May 17, 2017 00:31 IST2017-05-17T00:31:06+5:302017-05-17T00:31:06+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा उद्यान तुमसर शहराच्या मध्य भागी व्हावे यासाठी श्रीराम टॉकीजसमोर असलेली ...

प्रस्तावित जागेवरच शिवस्मारक उभारणार
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा उद्यान तुमसर शहराच्या मध्य भागी व्हावे यासाठी श्रीराम टॉकीजसमोर असलेली जागा अनेक वषार्पासून प्रस्तावित आहे. परंतु स्थानिक नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे आधीच्या प्रस्तावित जागेवर छत्रपती शिवरायांचा स्मारक होऊ शकला नाही ही अतिशय खेदाची बाब आहे. म्हणून सदर शिवस्मारक उभारण्यासाठी आता शिवसेनेनी हा अनेक वषार्पासून रखडलेला मुद्दा हाती घेतला असून स्मारक तयार करण्याचा विडा उचलला आहे.
तुमसर शहराचा मध्यभागी श्रीराम टॉकीजच्या अगदी अमोर समोरच्या जागेवर सध्या तात्पुर्ते अतिक्रमण करून काही व्यापाऱ्यांची दुकाने सुरु आहेत. अशा व्यापाऱ्यांनी सदर जागा मोकळी करण्यास सहकार्य करावे व छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्यान पूर्ण होण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही शिवसेना जिल्हाप्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांनी केले आहे.
या संदर्भात जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांच्याशी चर्चा करण्यात आली.
यात प्रस्तावित स्मारकाच्या जागेचा नजुलद्वारे मोजमाप करून स्मारकाच्या आजूबाजूला योग्य जागी व्यापारी बंधूना दुकानाची चाळ बांधून देण्याचे शिव स्मारक समितीद्वारे निर्णय घेण्याचे निश्चित झाले आहे,. जेणेकरून अनेकांचा व्यापार अस्तवेस्त होऊ नये. या छत्रपती शिवाजी स्मारकाला तुमसर शहरातील नागरिकांनी स्वखुशीने व गर्वांकित होऊन सहकार्य करावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.