शिवभोजन केंद्राचा गरजूंना मोठा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST2021-07-19T04:23:10+5:302021-07-19T04:23:10+5:30

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल सातत्याने प्रयत्नशील आहेत. याच अनुषंगाने जिल्ह्यात ...

Shivbhojan Kendra's big support to the needy | शिवभोजन केंद्राचा गरजूंना मोठा आधार

शिवभोजन केंद्राचा गरजूंना मोठा आधार

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल सातत्याने प्रयत्नशील आहेत. याच अनुषंगाने जिल्ह्यात शिवभोजन केंद्र मंजूर करण्यात आले आहे. रविवारी तुमसर येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून कोरोना संक्रमणाच्या संकटकाळात परिसरातील रोजगाराचे साधन उपलब्ध नसलेल्या गरीब लोकांना उत्कृष्ट भोजन मिळणार असल्याने संकटकाळात कोणतीही गरीब व्यक्ती उपाशी राहणार नाही. याकरिता शिव भोजन केंद्राचा लाभ गरजवंतांनी घ्यावा, असे आवाहन खा. पटेल यांनी केले.

या वेळी माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुधे, आमदार राजू कारेमोरे, धनंजय दलाल, विठ्ठलराव कहालकर, अमरनाथ रगडे, सुधाकर कारेमोरे, प्रभू मोहतुरे, राजेश देशमुख, योगेश सिंगनजुडे, मनोज वासनिक, प्रदीप भरनेकर, सलाम तुरक, तिलक गजभिये, पमाताई ठाकूर, विजया चोपकर, सरिता मदनकर, सरोज भुरे, नंदा डोरले, कविता साखरवाडे, जयश्री गभने, आरती चकोले, रहमत बी मिर्जा, मधुमती साखरवाडे, खेमराज गभने, जाकिर तुरक, उमाबाई साखरवाडे, वंदना आकरे, मेहताब सिंग ठाकूर, संकेत गजभिये, प्रदीप भुरे, खुशलता गजभिये, धनराज मेश्रामसहित अन्य पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Shivbhojan Kendra's big support to the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.