पुयार येथे शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:36 IST2021-02-24T04:36:18+5:302021-02-24T04:36:18+5:30
लाखांदूर : शिवभक्त ग्रुप व गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पुयार येथे १९ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वाटप करून छत्रपती शिवाजी ...

पुयार येथे शिवजयंती उत्साहात
लाखांदूर : शिवभक्त ग्रुप व गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पुयार येथे १९ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वाटप करून छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरपंच शैलेश रामटेके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच उत्तरा मेश्राम, शिवभक्त ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, ग्रा. पं.सदस्य रेखा दुपारे, रवींद्र गेडाम, हविना रामटेके, तंमुस अध्यक्ष तेजराम दिवटे, तमाजी सरपंच निलेश नाकतोडे, पो.पा. सुष्वगंधा बोरकर, भास्कर कापगते, दयारम बुरडे, डॉ. रॉय, भागवत लांजेवार, पुरुषोत्तम बगमारे, देवराव उके, एम.के. पारधी, विश्वनाथ देशमुख, आनंदराव पारधी, तसेच गावकरी मंडळी व शिवभक्त ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौरभ राऊत यांनी केले.