भाजयुमो पवनीतर्फे शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:06 IST2021-02-21T05:06:34+5:302021-02-21T05:06:34+5:30
भंडारा : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पवनी तालुक्याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने संभाजी चुटे रंगमंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी ...

भाजयुमो पवनीतर्फे शिवजयंती
भंडारा : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पवनी तालुक्याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने संभाजी चुटे रंगमंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, विलास काटेखाये, नगराध्यक्ष पूनम काटेखाये, माजी आमदार रामचंद्र अवसरे, अनिल मेंढे, एकनाथ बावनकर, महिला माेर्चा अध्यक्ष माधुरी नखाते, किशोर पंचभाई, राजेंद्र फुलबांधे, महेंद्र गोस्वामी, अनुराधा बुराडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार परिणय फुके यांनी छत्रपती शिवरायांनी १२ बलुतेदारांना एकत्रित करून मोघलाईचा नाईनाट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करून कधीही जातिभेद केला नाही, असे मार्गदर्शनातून सांगितले. संचालन विलास काटेखाये यांनी तर आभार पूनम काटेखाये यांनी मानले.