शिव संपर्क मोहीम यशस्वी राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:30+5:302021-07-15T04:24:30+5:30

रवी वाढई : पवनी शहर व तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद भंडारा : भंडारा जिल्हा शिवसेना पक्षातर्फे पक्ष प्रमुख, महाराष्ट्र ...

Shiv Sampark Mohim will be successfully implemented | शिव संपर्क मोहीम यशस्वी राबविणार

शिव संपर्क मोहीम यशस्वी राबविणार

रवी वाढई : पवनी शहर व तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

भंडारा : भंडारा जिल्हा शिवसेना पक्षातर्फे पक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार पवनी तालुका व पवनी शहरामधे शिव संपर्क मोहीम शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख ॲड. रवी वाढई यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली.

मोहिमेंतर्गत प्रत्येक गाव पातळीवरील पदाधिकारी व शिवसैनिकांशी संपर्क करून जनसेवा करण्याकरिता शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेंतर्गत प्रत्येक पंचायत समिती निहाय बैठका करून शाखांची पुनर्रचना करण्यात येत आहे.तसेच ठाकरे सरकारद्वारे आतापर्यंत केलेले कामे व योजनांची माहिती शिवसैनिकांना देण्यात आली. त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष भंडारा जिल्ह्यात मजबूत कशा प्रकारे केल्या जाईल,जनतेचे प्रश्न कशा प्रकारे सोडविता येतील यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. शिव संपर्क अभियानात कोरोना रोगावर कशा प्रकारे नियंत्रण आणले जाईल, लसीकरण जास्तीत जास्त जनतेनी करावे, यावर सुद्धा चर्चा करण्यात आली. शिव संपर्क मोहीम यशस्वी करण्याकरिता भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिक जोमाने कामाला लागलेले आहेत. २४ जुलैपर्यंत शिव संपर्क मोहीम राबविण्यात येत आहे.

मोहीम यशस्वी करण्याकरिता शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख ॲड. रवी वाढई, उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, महिला जिल्हा संघटक रश्मी पातुरकर, सपना जैस्वाल, पवनी शहर उपप्रमुख देवराज बावनकर, विभाग प्रमुख विलास बाळबुद्धे, अपर्णा खोब्रागडे, शालीकराम देशमुख, उपशहर प्रमुख अरविंद अंबादे, सावरला येथील सरपंच अनिता भाजीपाले, अरुण काटेखाये, मुन्ना तिघरे, दिलीप हटवार, तसेच पवनी तालुका व पवनी शहरातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Shiv Sampark Mohim will be successfully implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.