‘ती’ आली आणि पिलाला घेऊन जंगलात गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:26 IST2021-06-04T04:26:54+5:302021-06-04T04:26:54+5:30

अड्याळ : पाटबंधारे विभागाच्या पडक्या इमारतीत बुधवारी बिबट्याचा बछडा आढळून आला होता. वन विभागाने त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून ...

‘She’ came and took the piglet to the forest | ‘ती’ आली आणि पिलाला घेऊन जंगलात गेली

‘ती’ आली आणि पिलाला घेऊन जंगलात गेली

अड्याळ : पाटबंधारे विभागाच्या पडक्या इमारतीत बुधवारी बिबट्याचा बछडा आढळून आला होता. वन विभागाने त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून मादी बिबटाची प्रतीक्षा सुरू केली होती. बुधवारी सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी ती आली आणि पिलाला तोंडात पकडून जंगलाच्या दिशेने निघून गेली. हे दृश्य ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले. परिसरात बिबटाचे वास्तव्य असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

पवनी तालुक्यातील चकारा येथे पाटबंधारे विभागाच्या पडक्या इमारतीत बुधवारी सकाळी बिबट्याचा नवजात बछडा आढळून आला होता. वन विभागाने तेथे धाव घेतली. याच परिसरात बिबट असल्याने तो आपल्या पिलाला घेण्यासाठी येईल, अशी अपेक्षा होती. त्यावरूनच अड्याळ वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे व वनकर्मचाऱ्यांनी परिसरात गस्त वाढविली. तसेच दोन ट्रॅप कॅमेरे लावले. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ट्रॅप कॅमेऱ्यांची तपासणी केली तेव्हा बुधवारी सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी आपल्या बछड्याला तोंडात पकडून नेत असल्याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

बाॅक्स

परिसरात भीतीचे वातावरण

चकारा येथील मोडक्या इमारतीत बिबट्याचा बछडा आणि सायंकाळी त्या बिबट्याला घेऊन जाणारी मादी कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे परिसरात बिबट्याचे वास्तव्य सिद्ध झाले. परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी अड्याळ येथे एक अस्वल शिरली होती तर दुसऱ्या दिवशी चिचाळ येथील शेतमजुरावर हल्ला केला होता. आता बिबट आणि तिचे बछडे असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे.

Web Title: ‘She’ came and took the piglet to the forest