‘शेप’ने दीड कोटींनी गंडविले
By Admin | Updated: October 14, 2016 03:32 IST2016-10-14T03:32:30+5:302016-10-14T03:32:30+5:30
अभिनय अभिरूची कला व बहुउद्देशीय संस्था गडचिरोली अंतर्गत सिहोरा परिसरात सुरू करण्यात..

‘शेप’ने दीड कोटींनी गंडविले
पोलिसांना निवेदन : एजंटांच्या दारी दिवाळीपूर्वी खातेदारांचा राडा, शेती विक्रीतून खातेदारांची भरपाई
चुल्हाड (सिहोरा) : अभिनय अभिरूची कला व बहुउद्देशीय संस्था गडचिरोली अंतर्गत सिहोरा परिसरात सुरू करण्यात आलेल्या शेप महाबचत गट योजनेने खातेदारांन दीड कोटींनी गंडविल्याची तक्रार सिहोरा पोलिसांना देण्यात आली आहे. दिवाळीपुर्वी पैसे परत देण्यासाठी खातेदारांचा एजटांच्या घरी राडा सुरू झाला आहे.
सिहोरा परिसरात शेप महाबचत गट योजने अंतर्गत खातेदारांनी अनेक आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले आहे. ग्रामीण भागात जवळील साधणाऱ्या तरूणांना या महाबचत योजनेत संधी उपलब्ध करण्यात आली आहे. सिहोऱ्यात शेप महाबचत गट संस्थेचे कार्यालय आल्यानंतर गावा गावात एजंटांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कार्यालयात याच परिसरातील बेरोजगार तरूणांची नियुक्ती करण्यात आल्याने ग्रामीण भागात बचत गटांचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. कार्यालय अंतर्गत रोजगारांची संधी उपलब्ध झाल्याने तरूणांनी २ ते ३ लाख रूपयांची गुंतवणुक केली आहे. या शिवाय नित्यनिधी ठेव, बचत तथा दाम दुप्पट योजनेत अनेक खातेदारांनी राशीची गुंतवणुक केली आहे. एकट्या सिहोरा परिसरात राशी गुुंतवणुकीचा आकडा १ कोटी २७ लाख रूपयाचे घरात आहे.
कार्यरत कर्मचाऱ्यांची गुंतवणुक लक्षात घेता हा आकडा फुगणार आहे. यामुळे कोट्यावधी रूपयाची गुंतवणूक शेप महाबचत गटाने बुडविल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान दिवाळी पर्व सुरू झाल्याने खातेदारांनी कर्मचाऱ्यांना गुंतवणुक केलेल्या राशीची मागणी करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान जबाबदार यंत्रणाच बेपत्ता असल्याने स्थानिक २६ कर्मचाऱ्याची झोपच उडाली आहे. या एजटांनाच खातेदारांनी धारेवर घेण्यास सुरूवात केली आहे.
दिवाळीपूर्वी गुंतवणूक करण्यात आलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी रोज एजंटाच्या घरी खातेदारांचा राडा सुरू झाला आहे. परिसरात एका एजंटाने स्वत:ची शेती विक्री व गहाण ठेवून खातेदाराचे गुंतवणूक करण्यात आलेले पैसे परत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु अनेक कार्यरत कर्मचाऱ्याकडे स्वत:ची मालमत्ता विक्री करून पैसे परत करण्याचा उपाय नाही. यामुळे खातेदारांची चिंता वाढली आहे. खातेदारांचा वाढता टेंशन असल्याने अनेक एजंटांनी गावा बाहेर पडवाट शोधल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान सिहोरा स्थित कार्यालयात कार्यरत कर्मचारी व संलग्नीत गुंतवणूकदार तथा खातेदारांनी सिहोरा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. संपूर्ण जिल्ह्यात शेपने अनेकांना गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे.
रात्र आणि दिवस बिडी बांधण्याचे व्यवसायातून आपले भवितव्य सावरण्यासाठी पैशाची बचत केली. ही राशी शेपमध्ये गुंतवणूक केली. परंतु पै, पै जमा करण्यात आलेली राशी बुडाल्याची माहिती प्राप्त होताच गरीब बिडी कामगारांना हृदयविकारांचा झटका बसल्याची माहिती असून पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी कार्यरत कर्मचारी सुजीत गोंडाने यांनी केली आहे. (वार्ताहर)