सीमांकनाबाहेर रेतीचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:52 IST2017-12-05T23:52:32+5:302017-12-05T23:52:51+5:30
मुंढरी रेती घाट लिलावधारकांनी अवैध उपस्यासाठी अधिकाºयांशी संगनमत करीन सिंमाकनाबाहेर रेतीचा उपसा करित आहे.

सीमांकनाबाहेर रेतीचा उपसा
करडी (पालोरा) : मुंढरी रेती घाट लिलावधारकांनी अवैध उपस्यासाठी अधिकाºयांशी संगनमत करीन सिंमाकनाबाहेर रेतीचा उपसा करित आहे. त्यातही पर्यावरणाच्या कायद्याला ठेंगा दाखवित सुमारे ६ मीटरपर्यंत उपसा सुरू आहे. या गैरप्रकाराकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. दुसरीकडे प्रकरण दडपण्यासाठी उपोषणाकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली असून कुणीही दखल घेतलेली नाही.
मुंढरी बुज रेती घाटासाठी मुंढरी गावातील रस्ता करारनाम्यानुसार प्रस्तावित असताना घाटधारकांनी कान्हळगावातील हद्दीचा, रस्त्याचा तसेच शासकीय सामाजिक वनीकरणाच्या जागेचा गैरवापर चालविला आहे. त्याचबरोबर पर्यावणाच्या कायद्याला मुठमाती देत जमिनीपासून खरडून सुमारे दोन मीटर पर्यंत कृषक ट्रॅक्टरच्या सहायाने खुलेआम रेतीचा उपसा सुरू आहे. गावाचे व पर्यावरणाचे नुकसान होत आहे. मागील आठवड्यापासून या योजनेचे पाणी रेती घाटमालकाला दिले जात आहे. यासाठी ग्रामसभेची किंवा ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी नाही. बिलाचा भरणा मात्र, ग्रामपंचयतीला करावा लागत आहे. याची चौकशी कोण करणार हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे.
उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली
चार दिवसांपासून कान्हळगाववासीयांचे उपोषण सुरू असताना त्यांच्या मागण्या संदर्भात एकाही अधिकाºयाने पुढाकार घेतलेला नाही. उपोषणामुळे माजी सरपंच धनराज भोयर यांची प्रकृती खालावली आहे.
मुंढरी बुज रेती घाटात सिमांकनाबाहेर रेतीचा उपसा सुरू आहे. जमिनीला खरडून दोन मीटरपर्यंत उपसा केला जात आहे. पर्यावरणाच्या कायद्याला ठेंगा दाखविला जात आहे. चार दिवसापासून कान्हळगाव येथे उपोषण सुरू असून एकाची प्रकृती बिघडली असताना चर्चा केली नाही.
-सरिता चौरागडे,
जि. प. सदस्य बेटाळा .